पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): फसवणुकीच्या प्रकरणात माजी नगरसेवक उदय मडकईकर यांना आज पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीला हजेरी लावणार असल्याची हमी न्यायालयाला दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ग्राहक मंचाकडून वॉरंट आल्यानंतर आज सकाळी पणजी पोलिसांनी मडकईकर यांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली.
अधिक माहितीनुसार, अशोक मेनन व श्री. नायर अशा दोघांनी पणजीचे माजी नगरसेवक मडकईकर यांनी फ्लॅट विक्री प्रकरणात फसवणूक केल्याची तक्रार ग्राहक मंचाकडे केली होती. मात्र, पर्वरीतील ग्राहक मंचात सुनावणी सुरू झाल्यानंतर एकाही सुनावणीला मडकईकर उपस्थित राहिले नाहीत. तसेच, संबंधितांना ३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेशही मडकईकर यांना देण्यात आले होते. परंतु, या आदेशाला कोणतीही दाद त्यांनी दिली नसल्याने आज त्यांच्याविरुद्ध मंचाच्या न्यायाधीशांनी अटक वॉरंट जारी केला.
या आदेशानंतर सकाळी त्यांना अटक करून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपण आदेशाचे पालन करणार असल्याची हमी दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
Saturday, 30 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment