पणजी, दि. २७ (किशोर नाईक गांवकर): सध्याच्या या आघाडीच्या युगात कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे. अशाप्रसंगी समविचारी पक्षांशी जुळवून घेऊन पुढे जाणेच योग्य. गोव्यात भारतीय जनता पक्षाची विचारसरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी काही प्रमाणात मिळतीजुळती आहे. यापूर्वी या दोन्ही पक्षांची युती झालेली होती. गोव्यात कॉंग्रेसची भ्रष्ट राजवट उलथवून टाकायची असेल तर ही युती पुन्हा होणे गरजेचे आहे, असा स्पष्ट खुलासा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. सध्याचा म. गो पक्ष खरोखरच अजूनही गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विचारसरणीनुसार वाटचाल करीत असेल तर ही युती निश्चितच फलद्रूप होईल यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वासही श्रीपादभाऊ यांनी बोलून दाखवला.
भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी तथा लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमांत म. गो पक्षाकडे युती करण्याबाबतचा प्रस्ताव बोलून दाखवला होता. पक्षाच्या केंद्रीय प्रभारी आरती मेहरा यांनीही या विषयाला दुजोरा देत त्यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांनंतर राज्यात राजकीय पटलावर या संभाव्य युतीबाबत चर्चेचे गुर्हाळ उठले आहे. खासदार श्रीपाद नाईक यांनी या विषयावर बोलताना अधिक प्रकाश टाकला. गोव्यातील कॉंग्रेसरूपी भस्मासुराचा वध करणे हे भाजपचे प्रथम लक्ष्य आहे. हे साध्य करण्यासाठी समविचारी पक्षांची मदत घेणे अपरिहार्य आहे व त्यामुळेच म. गो.ची साथ घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी म. गो पक्षाची स्थापना करून सदोदित कॉंग्रेसच्या धोरणांविरोधात एकहाती लढा दिला. या पक्षाने १७ वर्षे राज्यही केले. गोव्याच्या विकासाचा खरा पाया हा भाऊसाहेबांनीच घातला हे कुणीही नाकारू शकणार नाही. ज्या कॉंग्रेस पक्षाविरोधात भाऊ लढले त्याच कॉंग्रेसबरोबर सत्तासोबत करण्याची कृती बहुतांश स्वाभिमानी म. गो कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. विविध भागांतून म. गो कार्यकर्त्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून त्यांना भाजप जवळचा वाटत असल्याचेच दिसून येते. अर्थात म. गो सत्तेत सामील असल्याने या प्रस्तावाबाबत तात्काळ निर्णय घेणे पक्षाला शक्य नाही याची जाणीव भाजपला आहे. या प्रस्तावाबाबत किमान संघटनात्मक पातळीवर निश्चितच चर्चा होऊ शकते व याच प्रतिसादाची वाट भाजप पाहत आहे. भाजपने म. गोशी युतीचा प्रस्ताव हा जनतेच्या दरबारात सादर केला आहे. जनतेकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे या युतीसंबंधी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप प्रयत्न करेल, असेही श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. गोव्यातील अल्पसंख्याकांच्या मनातही कॉंग्रेसविरोधातील रोष आता प्रकट होऊ लागला आहे. कॉंग्रेसकडून केवळ मतांसाठी या लोकांचा वापर करून घेतला जातो हे आता त्यांना कळून चुकले आहे. काही नेते नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची तयारी करीत असल्याने त्याकडेही भाजपचे लक्ष आहे. भाजपचा प्रभाव नसलेल्या काही मतदारसंघात कॉंग्रेसला विरोध करणार्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतही विचार केला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपकडून महिला, युवक, अल्पसंख्याक आदींचा गंभीरपणे विचार करेल, असेही श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.
Thursday, 28 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.
modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi
Post a Comment