पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): पेडणे व काणकोण तालुक्यानंतर आता सत्तरी, फोंडा व केपे तालुक्यांचे प्रादेशिक आराखडे अधिसूचित करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याने जारी केलेल्या या अधिसूचनेत सदर तालुक्यांतील वसाहत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. हे सर्व तालुक्यांचे आराखडे तालुका मुख्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही अधिसूचनेत म्हटले आहे.
गेल्या वर्षी पेडणे व काणकोण तालुक्यांचे आराखडे घोषित केल्यानंतर आता हे उर्वरित तीन तालुक्यांचे आराखडे अधिसूचित केले आहेत. पेडणे व काणकोणच्या आराखड्यांवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. सत्तरी,फांेंडा व केपे तालुक्यांच्या आराखड्याचे नकाशे अद्याप उपलब्ध झाले नसल्याने त्यात नेमकी काय परिस्थिती आहे, हे मात्र कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार जून २०११ पर्यंत सर्व अकराही तालुक्यांचे आराखडे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे.
Saturday, 30 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment