Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 April, 2011

मिकींना एक वर्ष तुरुंगवास

• वीजअभियंता मारहाण प्रकरण भोवले
मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): कपील नाटेकर या वीज अभियंत्याला तो सरकारी ड्युटीवर असताना मारहाण केल्याप्रकरणी बाणावलीचे आमदार फ्रान्सिस्क ऊर्फ मिकी पाशेको यांना भा. दं. सं. च्या कलम ३५३ खाली दोषी ठरवून त्यांना एक वर्ष साधा तुरुंगवास व पाच हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावणारा महत्वपूर्ण निवाडा आज येथील अतिरिक्त प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी देविदास केरकर यांनी दिला आहे. या निवाड्याचे गोव्याच्या राजकारणावर व मिकी यांच्या राजकीय भवितव्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज दुपारी भरगच्च न्यायालयात निवाडा वाचताना न्यायमूर्तींनी मिकी यांची ३४२ (कोंडणे) व ५०४ (अर्वाच्च शिवीगाळ करणे) या कलमांखालील आरोपांतून मुक्तता केली पण ३५३ कलमाखालील गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून आरोपीकडून भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी ही सरकारपक्षाची विनंती उचलून धरताना ही शिक्षा फर्मावली.
आरोपीस या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात जाण्यासाठी न्यायाधीशांनी नंतर या निवाड्याच्या कार्यवाहीस महिनाभरापुरती स्थगिती दिली. आरोपीने दंड भरला तर तो सरकारजमा केला जावा व तो भरला नाही तर आणखी एक महिना तुरुंगवास भोगावा असेही या निवाड्यात पुढे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
दिनांक १५ जुलै २००६ रोजी घडलेल्या या प्रकरणी २१ मे २००९ रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. तेही एका वेगळ्या परिस्थितीत. मिकी मंत्री असल्याने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांनी तब्बल तीन वर्षे काढली. अखेर ऍड. आयरिश रॉड्रगिस यांनी पोलिसांना कायदेशीर नोटीस देऊन आरोपपत्र सादर करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देताच खळबळ माजली व २१ मे २००९ रोजी आरोपपत्र दाखल केले गेले. गेली दोन वर्षे हा खटला चालला व त्यात ७ साक्षीदार तपासले गेले.
त्यावेळी पशुसंवर्धन व कृषीमंत्री असलेल्या मिकी पाशेको यांनी बेताळभाटी येथील आपल्या कार्यालयात वीज अभियंता असलेल्या कपील नाटेकरला बोलावून घेतले होते. यावेळी शिवराळ भाषा वापरून नाटेकर यांच्या सरळ मुस्कटात हाणली होती. तेव्हा नाटेकर हे सरकारी ड्युटीवर होते. नंतर या प्रकरणी कोलवा पोलिसांत मिकीविरोधात तक्रार झाली होती व त्यांनी तपास करून खटला दाखल केला होता.
न्या. केरकर यांनी आपल्या १६ पानी निवाड्यात आरोपीच्या वकिलांनी कोणत्याही मुद्यावर त्याला दोषी ठरवू नये. तो गोव्यातील मंत्री तसेच राजकीय नेता आहे व समाजात त्याला मान-प्रतिष्ठा आहे. त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे व म्हणून शिक्षा फर्मावताना सौम्य दृष्टिकोन बाळगावा व ताकीद देऊन त्याची मुक्तता करावी अशी जी विनंती केली होती ती साफ फेटाळून लावली. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कोणीही आपली बेकायदा कृत्ये पचवण्यासाठी आपल्या हातातील राजकीय सत्तेचा वापर करू शकत नाही असे बजावले.
या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासले गेले. फिर्यादीला कार्यालयात कोंडून ठेवले व शिवीगाळ केली हे आरोप मात्र सिद्ध झाले नाहीत. फिर्यादी स्वतः आरोपीच्या कार्यालयातून दार उघडून बाहेर आला व त्यावरून त्याला कोंडून ठेवलेले नव्हते तसेच आरोपीने नेमकी कशी शिवीगाळ केली तेही तक्रारीत नमूद केलेले नसल्याने ते सिद्ध होत नाही असे न्यायाधीशांनी नमूद केले आहे. मात्र फिर्यादीबरोबर गेलेला वीज खात्याचा वाहन चालक व दुसरा अभियंता बार्बोजा यांनी दिलेली साक्ष, त्यांनी लॉगबुकवर केलेली नोंद, फिर्यादीसंदर्भात डॉक्टरी अहवाल यावरून त्याला मारहाण झाल्याचे सिद्ध होते. सरकारी ड्युटीवरील कर्मचार्‍याला मारहाण करणे ही गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन करत ही शिक्षा ठोठावली आहे. सरकारच्या वतीने ऍड. कु. एस. गावडे तर मिकी पाशेकोंच्या वतीने ऍड. श्रीकांत नाईक यांनी काम पाहिले.
----------------------------------------------------------------
मिकी दाद मागणार
आज न्यायालयात सुनावणीवेळी मिकी पाशेको हजर होते. नंतर लगेच ते निघून गेले पण निवाड्याची प्रत घेण्यासाठी त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी न्यायालयीन निवाड्याबद्दल संपूर्ण आदर व्यक्त करून या निवाड्याविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
वरकरणी त्यांनी या निवाड्याचा आपणावर फारसा परिणाम झालेला नाही असे दाखविले पण नंतर ज्या प्रकारे ते ज्या प्रकारे निघून गेले त्यावरून ते बरेच हादरलेले दिसले. कारण अशा प्रकरणात न्यायालयात शिक्षा ठोठावलेले गोव्यातील ते पहिलेच आमदार तथा माजी मंत्री ठरलेले आहे. त्यांच्या अनेक भावी योजनांनाही या निवाड्यामुळे सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

1 comment:

Unknown said...

We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi