Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 27 July, 2010

पणजी महापालिकेतील भ्रष्टाचार कठोर कारवाई करण्याचे ज्योकिम यांचे आश्वासन

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेतील भ्रष्टाचाराची आपणास पूर्ण कल्पना असून यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी आज विधानसभेत दिले.
गाळे, दुकाने यांचे वितरण, पे पार्किंगचा गफला अशा अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचा तसेच अन्य गैरकारभाराचा सविस्तर अहवाल पालिका आयुक्तांनी पालिका संचालनालयाकडे पाठविला असून त्या अनुषंगाने आपण स्वतः कारवाईची शिफारस केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
नगरविकास खात्याच्या कपात सूचनेच्यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना श्री. आलेमाव उत्तर देत होते. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थितीत केलेले मुद्दे खरे असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असेही आलेमाव यांनी सांगितले.

No comments: