Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 28 March, 2011

मोहालीचा सामना पाहायला येणार गिलानी

भारताचे निमंत्रण स्वीकारले
इस्लामाबाद, दि. २७
विश्‍वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यापेक्षाही महत्त्वाचा ठरलेल्या भारत-पाक सामन्यासाठी दोन्ही देशांतील मुत्सद्देगिरीचे डाव सुरू झाले असून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मोहालीला सामना पाहण्याचे निमंत्रण पाकी पंतप्रधान युसुङ्ग रजा गिलानी यांनी स्वीकारले आहे.
३० मार्च रोजी मोहाली येथे भारत-पाक सामना होणार आहे. या सामन्यासाठी पाकमधूनही क्रिकेटप्रेमी भारतात येणार आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगदेखील हा सामना बघायला येणार आहेत. पण, येताना त्यांनी भारत-पाक संबंधांना द्विपक्षीय स्तरावर सुधारणेसाठीही वाव देत पाकी राष्ट्राध्यक्ष आसीङ्ग अली झरदारी आणि पंतप्रधान युसुङ्ग रजा गिलानी यांनाही सामना पाहण्याचे निमंत्रण देऊन टाकले. तब्बल २४ तास विचार केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांनी हे निमंत्रण स्वीकारल्याचा निरोप भारत सरकारला पाठविण्यात आला आहे. पण, याविषयीची अधिकृत कोणतीही घोषणा पाकी सरकारकडून अद्याप करण्यात आलेली नाही.
या सामन्याच्या निमित्ताने गिलानी आणि डॉ. सिंग यांची अनौपचारिक भेट आणि चर्चाही होईल. या सामन्यानंतर अधिकृत बैठक होईल, असे ‘द न्यूज’ या दैनिकाने म्हटले आहे.
‘द नेशन’ या वर्तमानपत्राने तर गिलानी या सामन्याच्या निमित्ताने भारताचा दोन दिवसीय दौरा करणार असल्याचे म्हटले होते. भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या सामन्याच्या माध्यमातून या निमंत्रण, दौरा प्रकाराला विविध प्रसार माध्यमांनी ‘क्रिकेट मुत्सद्देगिरी’ असे संबोधले आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने मात्र पाकी प्रशासनाने कोणताही निर्णय आपल्याला कळविला नसल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र ‘योग्य’ मार्गाने भारतीय पंतप्रधानांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आल्याचा दावा प्रसार माध्यमांनी केला आहे.

No comments: