पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): उदयपूरच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची केंद्रीय समिती, गोवा राजभाषा सल्लागार समिती आणि गोवा राज्य चित्रपट महोत्सव सल्लागार समिती अशा तीन समित्यांवरील सदस्यपदांचे राजीनामे आज विष्णू सूर्या वाघ यांनी संबंधित संस्थांकडे सुपूर्द केले. तिन्ही पदांच्या राजीनाम्यांसोबत श्री. वाघ यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून ‘मार्लीश’ भाषेत एक पत्र लिहिले असून त्यात सरकारच्या माध्यमविषयक धोरणाचा निषेध म्हणून आपण या समित्यांवरून बाजूला होत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात श्री. वाघ यांनी माध्यम सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. दर आठवड्याला एका पदाचा राजीनामा देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पण येत्या काही दिवसांत आपण गोव्याबाहेर जाणार असल्याने पुढील आठवड्यात राजीनामा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे तीन राजीनामापत्रे एकत्रच सादर केल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. पुढचे राजीनामापत्र ‘कोंक्लीश’ भाषेतून असेल, असेही वाघ यांनी कळवले आहे.
Tuesday, 5 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment