Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 July, 2011

‘एनएसजी’चे संकेतस्थळ हॅक

नवी दिल्ली, दि.३ : राष्ट्रीय संरक्षण दलाचे (एनएसजी) संकेतस्थळ आज काही अज्ञात व्यक्तींनी ‘हॅक’ केल्याचे निदर्शनास आले. अधिकार्‍यांचेई-मेेलसुद्धा हॅक झाल्याचे समजते. हा प्रकार लक्षात येताच सर्व अधिकार्‍यांना आणि पालम येथील एनएसजीच्या मुख्यालयाला काही काळ इंटरनेट वापर टाळण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी परिस्थिती धोकादायक नसल्याचे येथील प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणतीही महत्त्वाची आणि गोपनीय माहिती संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली नव्हती.

‘२ जी स्पेक्ट्रम’ची
आज सुनावणी
नवी दिल्ली, दि. ३
२ जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात उद्या सोमवारपासून पुन्हा सुनावणीस प्रारंभ होणार आहे. उन्हाळ्यात न्यायालयीन कामकाज बंद असल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली होती. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कानिमोझी, स्वान टेलिकॉमचा प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा व इतर ११ अन्य आरोपींना उद्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.

सत्यसाईंच्या आश्रमातून
आणखी संपत्ती जप्त
पुट्टपार्थी, दि.३
सत्यसाईबाबांच्या आश्रमातून संपत्ती मिळण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. आश्रमात जिथे सत्यसाई वास्तव्य करायचे त्याच यर्जुमंदिरातून आणखी ७७ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली. याच मंदिरात सत्यसाई यांच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे.

जे. डे हत्याकांड
बिल्डरला अटक

मुंबई, दि. ३
ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज पोलिसांनी बिल्डर विनोद असरानी ऊर्ङ्ग विनोद चेंबूर याला अटक केली आहे. कोर्टाने विनोदला सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पत्रकार डे यांच्या हत्येच्या कटात विनोदचा थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकर्‍यांना पैसे देण्याचे काम विनोदनेच केले. त्यानेच डे यांच्याविषयीची महत्त्वाची माहिती मारेकर्‍यांना पुरविली होती.

जयललितांनी केली
मंत्र्याची हकालपट्टी
चेन्नई, दि. ३
मे महिन्यात सत्ता हाती घेतल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मंत्रिमंडळात ङ्गेरबदल केले आहेत. एवढेच नव्हे तर एका मंत्र्याची हकालपट्टीही करून टाकली आहे. जयललितांच्या टीममधील कायदेमंत्री ई. सुबय्या यांना डच्चू देण्यात आला आहे. माहिती मंत्री जी. सेंतामिझान यांना कायदे मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सुबय्या यांच्या जाण्यानंतर पी. चेंदूर पांडियन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

श्रीनगरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

श्रीनगर, दि.३
श्रीनगरच्या निदा हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवण्यार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर येथे चालणारे सर्व गैरव्यवहार उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केली असून त्यात ४ महिलांचा समावेश आहे.


सर्वोच्च न्यायालयात
२६ निकालांची शक्यता
नवी दिल्ली, दि. ३
४९ दिवसांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. यात पहिल्याच दिवशी २६ प्रकरणांचे निकाल लागणे अपेक्षित आहे.न्या. आर. व्ही. रवीन्द्रन आणि न्या. ए. के. पटनायक यांच्या न्यायासनासमोर सर्वाधिक १० खटल्यांची सुनावणी होईल. न्या. मुकुंदकम शर्मा आणि न्या. ए. आर. दवे यांचे न्यायासन पाच निकाल देणार आहे.

रेल्वे खाली आल्याने
तिघांचा मृत्यूू
बगाह (बिहार), दि. ३ : बगाह जिल्ह्यातील धर्मापूर गावाजवळ नरकाटियागंज-गोरखपूर पॅसेंजर या भरधाव गाडीखाली येऊन ३ जणांचा मृत्यू झाला. या तिघांचीही ओळख अजून पटलेली नाही. ही गाडी गेल्यानंतर या तिघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडलेले स्थानिक लोकांना आढळून आले.

No comments: