Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 16 August, 2010

लेनला वास्तव स्वीकारायचे नाही

खुद्द लेन नमूद करतो, The British Resident Grant Duff wrote his book with the purpose of portraying Shivaji as plunderer and a freebooter and his Swaraj movement as historical accident, a forest fire in the pearched grass of Sahyadri mountains..... In opposition to Grant Duff, virtually every Maharshtrian writer after Phule saw Shivaji as the father of a nation, a liberationist .... what was never really questioned was the primordial category of 'nation' and nobility of that nation's father Shivaji (पृ ७०). येथे नोंद केली पाहिजे की ग्रॅंट डफसुद्धा शिवाजीचे राज्य न म्हणता स्वराज्य म्हणतो.
परत एकदा लेनचे मानसिक दुखणे येथे बळावते. त्याला भारत हा एक देश आहे हे वास्तव स्वीकारायचेच नाही. त्याच्या मते महाराष्ट्रीय इतिहासकार आणि लेखकांनी हा एक सूत्रात बांधलेला देश आहे या गृहीतकालाच स्वीकारू नये.
लेनने शिवचरित्र संदर्भात तीन प्रमुख व्यक्तींच्या दृष्टिकोनांची चर्चा केली आहे. तो लिहितो की अनेक लेखकांचे लिखाण लक्षात घेऊनही 'I will confine my discussion here to consideration of three turn - of - the - century figures who represent distinct movements or visions, and employ the Shivaji legend with differing ideological strategies in conceiving and independence from Britain (पृ. ७०). त्यात पहिले नाव श्री. केळुस्करांचे आहे. त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र लिहून १९०७ साली छत्रपती शाहूंना समर्पण केले. दुसरे नाव लोकमान्य टिळकांचे आहे. लोकमान्य टिळकांनी शिवचरित्र लिहिले नाही, पण शिवाजी उत्सव सुरू केला आणि स्वराज्य विषयक चळवळीला स्फूर्तिस्थान दिले.
लो. टिळकांच्या या उपक्रमाबाबत लेन लिहितो, 'He saw in Shivaji a hero who in earlier age rejected the legitimacy of status quo Islamicate rule, just as he himself hoped to reject the legitimacy of Biritish rule. (पृ. ७२)
तिसरे नाव म. गो. रानडे यांचे. रानड्यांनी `The rise of Maratha Power' हा प्रबोधनात्मक ग्रंथ लिहिला. एक नमूद केले पाहिजे की या वेळेपर्यंत शिवचरित्रांची साधने गोळा करण्यास सुरुवात झाली नव्हती.
न्या. रानड्यांनी शिवाजीकालीन सामाजिक स्थितीची मीमांसा करताना त्यावेळी झालेल्या जनजागृतीच्या मागे संतांची शिकवण आणि सामाजिक प्रबोधन यावर भर दिला. त्याला शिवाजी महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाची जोड लाभताच स्वराज्य निर्माण झाले. लेनच्या मते रानड्यांच्या या ग्रंथाने - जे शिवचरित्र नव्हते - भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय झाला.
या संदर्भात न्या. रानड्यांचा हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय होता याबाबत लेनने निरर्थक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'Who was Ranade writing for? His British employers? To convince them that they ruled a nation that, like theirs, had gone through a kind of Reformation and enligtenment that gave the region a Vernacular language, tolerant inclusive national religion and a common patriotism that overcame class distinctions? or was he writing for his fellow indian reformers, who were committed to the idea that the colonial period would be a period of education, a school in which Indians could learn the fundamentals of nation building, religious tolerance, enlightened social reform, egalitarian patriotism? or was he responding to a sort of internalised external audience, the British interlocutor now deeply lodged in his double consciousness? (पृ. ७५)
वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. रानडे ज्यांची नोकरी करत होते त्या इंग्रजी राज्यकर्त्यांना पटवून देण्याची - ते ही एक पुस्तक लिहून- शक्यता नव्हती. तसे असते तर इंग्रज केव्हाच भारत सोडून चालते झाले असते. भारतीय आशा आकांक्षांशी सहमत असणाऱ्या ब्रिटीश नागरिकांची संख्या नगण्य होती. त्यांना पुस्तकातील मजकूर पटला असता तरी राज्यकर्त्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामी तो आला नसता. राहता राहिले भारतीय नागरिक! ते पारतंत्र्याच्या जोखडाखाली, लो. टिळकांच्याच शब्दांत सांगायचे तर ते थंड झालेल्या गोळ्याप्रमाणे निष्क्रिय होऊन पडले होते. त्यात प्राण ओतण्याचे काम या रानड्यांनी केले असे लो. टिळकांनी न्या. रानड्यांवर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखात रानड्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. ते "एतद्देशीयांमध्ये' जागृती आणण्यासाठी झटत होते.

No comments: