Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 20 August, 2010

तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाची चपराक

नवी दिल्ली, दि. १९ - सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जबानीप्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली आहे.
गोध्रा प्रकरणानंतर नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबानी आणि यासंदर्भातील तपासाचा तपशील यापैकी कोणताही भाग आम जनतेसाठी खुला केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायलयाने आज विशेष चौकशी पथकाला बजावले. ही माहिती केवळ सरकारी वकील आणि संबंधित तपास अधिकारी यांच्यापुरतीच मर्यादित राहायला हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यातील एका प्रकरणात श्रीमती सेटलवाड यांनी सरकारी वकिलांशी संपर्क साधल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सेटलवाड न्यायालयात उपस्थित होत्या. त्यांनीही आपण संबंधित वकिलाशी संपर्क साधल्याचे मान्य केले. मात्र आपण त्यांना कसलीही धमकी दिल्याचा सेटलवाड यांनी इन्कार केला. त्यावर न्यायलयाने, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आम्ही त्याची नोंद घेतली आहे, असे सांगितले.

No comments: