Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 20 July, 2010

बसमालक संघटनेचा उपोषणाचा निर्णय मागे

मागण्या अंशतः मान्य

पणजी, दि.१९ (प्रतिनिधी) - सरकारने बसमालकांची ७ व ९ कि. मी. साठीचा दर वाढविण्याची मागणी मान्य करून इतर मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिल्याने खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी घेतलेला आमरण उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.
प्रत्येक कि.मी. मागे १० पैशांऐवजी १५ पैसे दरवाढ मिळावी व सरकारने दिलेल्या दरवाढीचा ७ व ९ कि.मी. अंतरासाठी फायदा मिळत नाही, या अंतरासाठी दरवाढ मिळावी अशा मागण्या खाजगी बसमालक संघटनेने केल्या होत्या व या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी १९ पासून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.
बसमालक संघटना, वाहतूक संचालक व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यामध्ये आज बोलणी होऊन पहिल्या ७ व ९ कि.मि. साठी १५ पैसे दरवाढ जाहीर करण्यात आली. त्यामुळे बसमालकांना पहिल्या ७ व ९ व कि.मी.साठी ४५ पैशांऐवजी ६० पैसे दरवाढ मिळून एकूण १ रू. चा फायदा होणार आहे.

No comments: