Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 4 December, 2009

ग्रॅमी पुरस्कारासाठी रहमानचे नामांकन

लॉस एंजिल्स, दि.३ : ऑस्कर विजेते भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे "स्लमडॉग मिलेनियर'मधील दोन गाण्यांसाठी ग्रॅमी पुरस्कारात नामांकन झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत जगतात ग्रॅमी हे सर्वोच्च मानाचे पुरस्कार मानले जातात. २०१० च्या ग्रॅमी पुरस्कारासाठी रहमानच्या दोन गीतांचे नामांकन झाले आहे. त्यांच्या "जय हो' या गाण्याला "बेस्ट कम्पाईलेशन साऊंड ट्रॅक अल्बम फॉर मोशन पिक्चर' या श्रेेेणीत नामांकन मिळाले आहे.
गुलजार यांनी लिहिलेल्या "जय हो' या गीताला नामांकनाच्या शर्यतीत ब्रूस स्प्रिंगस्टीनचे शीर्षक गीत, कॅडिलेक रेकॉर्डस्चे "वन्स इन ए लाईफटाईम', ट्विलाईटचे गीत "डीकोड' आणि "द मुव्ही' चित्रपटाचे गीत "द क्लाईंट' यांच्याशी सामना करावा लागणार आहे. ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण लॉस एंजिल्स येथील स्टेपल सेंटर येथे ३१ जानेवारी रोजी केले जाणार आहे.

No comments: