Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 February, 2011

उमेदवारी अर्जांची संख्या १८० वर

आज ३९ अर्ज दाखल, उद्या शेवटचा दिवस
(पणजी महापालका निवडणूक)

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज शुक्रवार दि. १९ रोजी ३९ अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या १८० वर पोहोचली आहे. सोमवार दि. २१ फेबु्रवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
कॉंग्रेसचे मंत्री बाबूश मोन्सेर्रात यांचे ‘पणजी विकास आघाडी’ पॅनल, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचे समर्थन लाभलेले व माजी महापौर अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील ‘पणजी फर्स्ट’ पॅनल व राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा लाभलेले ‘टुगेदर फॉर पणजी’ पॅनल यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केलेले आहेत. अनेकांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांचा आकडा फुगत चालला आहे. २३ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारांचा नेमका आकडा जाहीर होणार आहे. वरील तिन्ही पॅनल्सचा व अपक्ष उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे, मात्र २३ फेबु्रवारी नंतरच प्रचाराला खरा जोर येणार आहे. आज पुढील व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांचे प्रभाग व नावे अशी : नॅटी पो, इलिबो डिसोझा, नाझारेथ काब्राल, महेश शिरोडकर, मार्गारिटा कुयल्लो फर्नांडिस, कॅरोलिना पो, शुभदा रुपेश शिरगावकर, बेंटो लॉर्ना सिल्वेस्टर, सुचिता अनंत गायतोंडे सिनॉय, मारिया रेजिना आल्मेदा, सुप्रिया भजे, दुर्गा केळुस्कर, प्रशिला कुंकळकर, मंगला कारापूरकर, आदम शेख, मंगलदास नाईक, पास्कोलिया मास्कारेन्हस, नीलेश खांडेपारकर, संदीप खांडेपारकर, समीर च्यारी, योगेंद्र सिरसाट, रवीश खराडे, दिपाली जनार्दन नाईक, रत्नाकर फातर्पेकर, मारिया रिटा परेरा फर्नांडिस, डिवोदिता डिक्रुझ, सूरज कांदे (दोन अर्ज), रेखा कांदे, विरेन महाले, माया तळकर, हेमा चोपडेकर, मंदा शेट्ये, नमिता नार्वेकर, ऑस्कर मिनेझिस कुन्हा, देवेंद्र कुंडईकर, नरेश कांबळी, वनिता फर्नांडिस व विविना नास्नोडकर.
उमेदवारी अर्जांची
संख्या १८० वर

No comments: