न्या. शहा यांचे गोव्यात आगमन
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
‘उटा’च्या आंदोलनावेळी बाळ्ळी येथे घडलेल्या जळीतकांडाची न्यायालयीन चौकशी चार आठवड्यांनंतर सुरू करण्याचे आज ठरले. या चौकशीसाठी दक्षिण गोव्यात कार्यालय स्थापन करण्यात येणार असून या कथित जळीतकांडप्रकरणी कोणतीही माहिती किंवा पुरावे असल्यास ते चौकशी आयोगासमोर सादर करण्यासाठी जाहीर आवाहन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने बाळ्ळी जळितकांड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. के. शहा यांची नियुक्ती केली आहे. श्री. शहा यांचे आज गोव्यात आगमन झाले. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आज निवृत्त न्या. शहा यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीत या चौकशीबाबतची पद्धत ठरवण्यात आली. किमान तीन महिन्यांनी ही चौकशी पूर्ण व्हावी, असे या बैठकीत ठरवण्यात आले. या चौकशीसाठी दक्षिण गोव्यात कार्यालय स्थापन करण्याचे ठरले व त्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांची मदत घेतली जाणार आहे. या चौकशी आयोगासाठी कर्मचारी व अधिकारिवर्गाची नेमणूक करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.
या बैठकीसाठी कायदा सचिव प्रमोद कामत तसेच विशेष गृह सचिव, कार्मिक सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.
Wednesday, 27 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment