Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 March, 2011

‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ आज घुमणार

भव्य सभेचे आयोजन

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
गोव्यातील भूमिपुत्रांच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून गोव्यातील सुमारे ५० स्वयंसेवी सामाजिक संघटना एकत्र आल्या असून उद्या दि. १५ पासून या संघटनांतर्फे एकत्रितरीत्या ‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ या नावाने गोव्यातील समाजविघातक गोष्टीविरुद्ध आंदोलन छेडले जाणार आहे.
गोव्यातील विविध भागांत गोव्याच्या हितासाठी लढणार्‍या गोमंतकीय संघटना एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असूून संध्याकाळी ३ वाजता आझाद मैदानावर या संघटनांतर्फे गोव्याच्या हितासाठी विविध मागण्या सादर होणार आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ पुढील काळात प्रयत्न करणार आहे.
गोव्यातील वाढलेल्या खाणींचे प्राबल्य कमी व्हावे, बेकायदा खाणी त्वरित बंद व्हाव्यात, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, भूमिपुत्रांना त्वरित रोजगार मिळावेत, भ्रष्टाचारावर अंकुश ठेवून भ्रष्टाचारी लोकांना कडक शिक्षा व्हावी, मांडवीतील कॅसिनो त्वरित हद्दपार करावेत, प्रशासनात सुधारणा यावी, बिगर गोमंतकीयांच्या गोव्यात दाखल होण्यावर नियंत्रण ठेवावे आदी मागण्या या सभेतून केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, भव्य मोर्चा काढण्यात येईल व त्यानंतर आझाद मैदानावर सभा होणार असून या सभेला प्रत्येक गोवेकराने हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: