Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 March, 2011

जपानमध्ये दुसर्‍या अणुभट्टीतही स्फोट

टोकियो, दि. १४
भूकंपग्रस्त भागातील ङ्गुकुशिमा येथील अणुऊर्जा केंद्रात हायड्रोजनचा दुसरा स्ङ्गोट झाला असून, त्यात ११ लोक जखमी झाले आहेत. दरम्यान या केंद्रातील संयंत्र वितळण्याची भीती व्यक्त करण्यात येत असतानाच या केंद्रातून बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गाची मात्रा नियंत्रणात कशी राहील, याचे प्रयत्न जपान सरकार करीत आहे.
स्थानिक वेळेनुसार, आज सकाळी ११ च्या सुमारास ङ्गुकुशिमाच्या संयंत्र क्रमांक तीनमध्ये हायड्रोजनचा स्ङ्गोट झाल्यानंतर आकाशात उंचच उंच काळे ढग दिसून आले. परंतु यात यातील कंटेनरचे नुकसान झालेले नाही, असे जपानच्या अणु सुरक्षा संस्थेने म्हटले आहे. या संयंत्रातून बाहेर पडलेल्या किरणोत्सर्गाची मात्रा ङ्गारच कमी आहे, असे आम्हाला आढळून आले आहे, असे मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव युकिओ एडानो यांनी एका पत्रकारपरिषदेत सांगितले. संयंत्र क्रमांक तीनला थंड करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर करणे सुरू आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
क्षतिग्रस्त संयंत्र क्रमांक तीनमध्ये समुद्राचे पाणी टाकण्याचे प्रयत्न यासाठी सुरू आहेत की, हे संयंत्र पूर्णपणे वितळले जाऊ नये. संयंत्र अति तापून ते वितळू नये यासाठी हे सारे प्रयत्न सुरू आहेत, असे या अधिकार्‍याने सांगितले. संयंत्राची इमारत उद्ध्वस्त झाली असली तरी यातील मुख्य यंत्राला त्यामुळे धक्का बसलेला नाही. आजही संयंत्र क्रमांक तीनमधील नियंत्रण कक्ष कार्यरत आहे, याकडे व्हिएन्नास्थित आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले आहे.
आज झालेल्या स्ङ्गोटात ११ लोक जखमी झाले असून, यात चार कर्मचारी आहेत तर चार स्वयंसेवी सुरक्षा दलाचे चार लोक आहेत, असे टोकिओ ईलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा हवाला देत सरकारी प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी जपानला बसलेला भूकंपाचा धक्का हा ८.९ रिश्टर स्केलचा नव्हता तर तो ९ रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा होता, ही बाब आता समोर आली आहे. या भूकंपापाठोपाठ आलेल्या त्सुनामीत १० हजारावर लोक मृत्युमुखी पडले आहेत तर हजारो बेपत्ता आहेत. ङ्गुकुशिमा अणुऊर्जा केंद्राच्या प्रमुखाने म्हटले आहे की, स्ङ्गोटानंतर हवेत पसरलेल्या किरणोत्सर्गाची मात्रा ङ्गार कमी आहे. आज झालेल्या स्ङ्गोटात गेल्या शुक्रवारी झालेल्या स्ङ्गोटाप्रमाणेच याही इमारतीचा वरचा मजला नष्ट झाला आहे. इतर प्रसिध्दी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, आज तिसर्‍या संयंत्रात झालेल्या स्ङ्गोटाचा आवाज जवळपास ४० किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. या संयंत्रात समुद्राचे पाणी टाकण्याचे काम अद्यापही जारी आहे जेणे करून हे संयंत्र थंड राहावे. कारण भूकंपानंतर या अणुऊर्जा केंद्रातील संयंत्राला थंड ठेवण्याची यंत्रणाच पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. त्यामुळे संयंत्र अधिकाधिक तप्त होऊ लागली आहेत व त्यामुळेच येथे एकापाठोपाठ एक संयंत्रात स्ङ्गोट होत आहे. ङ्गुकुशिमा अणुऊर्जा केंद्रापासून २० किमी परिसरातील दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून आतापयर्र्त ३.५ लाख लोकांना या भागातून हलविण्यात आलेले आहे.

No comments: