Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 30 May, 2010

ज्ञानेश्वरी एक्सप्रेस अपघात बळीसंख्या ११५, तर २५० जखमी

झरग्राम (प. बंगाल), दि. २९ - मुंबईला निघालेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला परवा मध्यरात्री झारग्रामजवळ उडवून दिल्यानंतर झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या वाढतच असून ती आता ११५ च्या जवळ पोहोचली असून जखमींचीही संख्या आता २५० झाली आहे. आज सकाळी अपघातग्रस्त डब्यांतून आणखी काही प्रवाशांची प्रेते बाहेर काढण्यात आली. काल रात्रभर मदतकार्य सुरू होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना दक्षिण पूर्व रेेेेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्यांची संख्या आता २५० पर्यंत गेली आहे. यापैकी पाच गंभीर जखमींना उपचारासाठी कोलकाता येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त डब्यांतून आतापर्यंत ११५ प्रवाशांची प्रेते बाहेर काढण्यात आली आहेत. यापैकी १०८ जणांचे मृतदेह मिदनापूर येथील दवाखान्यात तर दोन मृतदेह खडगपूर येथील रेल्वेेेेेेेच्या दवाखान्यात ठेवण्यात आलेेेेेले आहेत, असे पश्चिम मिदनापूरचे पोलिस अधीक्षक मनोजकुमार वर्मा यांनी पीटीआयला सांगितले. यापैकी केवळ २५ जणांच्या मृतदेहांची ओेेळख पटली आहे तर ६० जणांचे पोस्टमार्टम झालेले आहे.
अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो कारण की दुर्घटनेत सर्वाधिक फटका बसलेल्या एस-५ व एस-६ या डब्यांना अद्याप कापण्यात आलेले नाही. दरम्यान, आज दुपारी साडेचारपर्यंत सुरू असलेल्या मदत कार्यात मालगाडीच्या इंजीनखाली पंधरा जणांचे मृतदेह आढळून आले, असे रेेेेेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. खेमासोली व सारदिया या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान हावडा-कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्सप्रेेस धावत असताना माओवाद्यांनी तिला उडवून दिले होते.
गरज भासल्यास डीएनए चाचणीही घेतली जाईल व त्यासाठी असे मृतदेह रुग्णालयात योग्य प्रकारे सांभाळून ठेेवण्यात येत आहेत, असेही हा अधिकारी म्हणाला.
मिदनापूर येथील दवाखान्यात दोन तात्पुरती शिबिरे स्थापन करण्यात आली असून तेथे मृतकांच्या तसेच जखमींच्या नातेवाईकांना माहिती मिळू शकते. याशिवाय मृतांची छायाचित्रेही मिदनापूर येथील दवाखान्यात लावण्यात आलेली आहेत. इतकेच नाही तर सरकारी वेबसाईटवरही ती टाकण्यात आलेली आहेत, असे वर्मा यांनी सांगितले.
दरम्यान ही अपघात स्फोटाच्या साह्याने घडवून आणण्यात आली की हा माओवाद्यांनी घडवून आणलेला घातपात होता यावर अद्यापही तर्कवितर्क केले जात असले तरी काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, अपघात घडण्याच्या आधी आम्हाला कोणत्याही प्रकारचा स्फोटासारखा आवाज ऐकू आला नाही. रुळांना जोेडणारे सांधे काढून टाकण्यात आलेेले दिसून आले असून हा घातपाताचाच प्रकार आहे व तो माओवाद्यांनीच घडवून आणला आहे. चिदम्बरम् यांनीही हा घातपाताचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त करीत अपघात घडवून आणताना स्फोटांचा वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, याकडेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले होते. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी असे म्हटलेले आहे की अपघातस्थळी टीएनटी स्फोटके तसेच जिलेटीन कांड्या आढळून आल्या आहेत.

अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध
गुन्हे दाखल

मिदनापूर रेल्वे घातपात संदर्भात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

No comments: