Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 24 June, 2010

जामिनमुक्त अटलाकडून न्यायालयाचा अवमान

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - किनारी भागात प्रवेश न करण्याच्या अटीवर जामिनावर मुक्त केलेला यानिव बेनाईम ऊर्फ "अटाला' याने तुरुंगातून बाहेर येताच या न्यायालयाचा अवमान केला आहे. तुरुंगातून सुटताच आज रात्री तो शापोरा येथे गेल्याची पक्की माहिती उपलब्ध झाली आहे. पणजी येथून आज रात्री ९.३० वाजता भाड्याची टॅक्सी करून गेलेला "अटाला' थेट शापोरा येथील एका मित्राच्या घरी गेल्याची माहिती मिळाली आहे.
वकिलांच्या कार्यालयातून निघताना पत्रकारांशी बोलताना "अटाला' म्हणाला की, गोव्यात कोणताही सामान्य व्यक्ती अमलीपदार्थाचे सेवन करतो तसाच मी सुद्धा अमलीपदार्थ घेतो. मात्र ड्रग व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. यावेळी ड्रग माफिया आणि पोलिस साटेलोटे प्रकरणात निलंबित झालेला निरीक्षक आशिष शिरोडकर याच्याबद्दल बोलण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. ""मला आशिषबद्दल काहीही बोलायचे नाही'' असे तो म्हणाला. यापूर्वी आशिष याच्याबद्दल स्पष्ट "यू ट्यूब'वर बोलताना अटाला याला अनेकांनी पाहिले आहे.
चार महिन्यांच्या तुरुंगातून त्याची आज सायंकाळी सुटका झाली. संकेत स्थळावर "अपलोड' झालेला "यू ट्यूब' म्हणजे एक "जोक' आहे. त्यात काहीही नाही. प्रसिद्ध माध्यमाचे प्रतिनिधी माझ्यामागे हात धुऊन लागले आहेत. त्यांचे वृत्त खपत असल्याने ते असे करत आहेत. लकी फार्महाऊस हिच्याशी गेल्या चार वर्षांपासून आपण कोणताही संबंध ठेवलेला नसून तिच्याशी बोलणेही झाले नसल्याचा दावा त्याने केला.

No comments: