Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 August, 2009

गर्दी टाळा हाच महामंत्र पाळा

पर्यटन हंगामासाठी लवकरच कृती आराखडा

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या काळात गर्दी टाळा, खबरदारी घ्या व स्वाईन फ्लूबाबत काळजी घेऊन हा सण साजरा करा,असा मूलमंत्र आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला. "स्वाईन फ्लू'बाबत सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेतच; परंतु लोकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. पुढील पर्यटन हंगामाच्या अनुषंगाने येत्या १५ सप्टेंबरपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात येईल,अशी माहितीही श्री.राणे यांनी दिली. स्वाईन फ्लूबाबत कुणाला कोणतीही माहिती हवी असेल तर त्यांनी २४५८४५८ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही यावेळी कळवण्यात आले.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, गोमेकॉचे डिन डॉ. व्ही. एन. जिंदाल,आरोग्य संचालिका डॉ.राजनंदा देसाई आदी हजर होते.अलीकडेच याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्याशी चर्चा केल्याची माहिती श्री.राणे यांनी दिली.गोव्यात पुढील महिन्यापासून पर्यटन हंगाम सुरू होतो आहे, त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्राने गोव्याला चार थर्मल स्कॅनर्स पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत याप्रकरणी कृती आराखडा तयार केला जाईल. येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्व खाजगी इस्पितळांच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचीही मदत घेण्याचे ठरवले आहे. डॉ.ऑस्कर रिबेलो. डॉ.शेखर साळकर, डॉ.रूफिन मोतेंरो,डॉ.वीरेंद्र गांवकर आदींबरोबर चर्चा करून एक पथक तयार करून या साथीबाबत पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहितीही यावेळी श्री.राणे दिली.
राज्यभरात लवकरच किमान शंभर खाटींची सोय स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी केली जाणार आहे.गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला चार "व्हेंटिलेटर' खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.सध्या एखाद्या संशयित रुग्णांत "स्वाईन फ्लू'ची निश्चित लक्षणे आढळल्यास "टेमीफ्लू'गोळ्या चालू करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
गोव्यात आत्तापर्यंत ७० हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली. १०९ संशयितांची तपासणी करण्यात आली.त्यात ४८ लोकांचे चाचणी अहवाल आलेत व १८ रुग्ण स्वाईनफ्लू बाधीत असल्याचे जाहीर झाले.६१ संशयितांच्या चाचणीचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. चाचणीसाठी विलंब होत असल्याने त्यासंबंधी खाजगी इस्पितळाकडे करार करण्याबाबत किंवा यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
साथ नियंत्रण कायद्याचा फेरआढावा घेणार
सध्याच्या परिस्थितीत साथ नियंत्रण कायदा लागू करण्याचा विचार नसला तरी या कायद्याबाबतचा आढावा घेतला जाईल,असे मंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यास आरोग्य खात्याला काही प्रमाणात जादा अधिकार प्राप्त होतात व त्यामुळे कृतीला गती मिळण्यास मदत होते,असेही त्यांनी सांगितले.

"तो' रुग्ण "स्वाईन'बाधित नाही!
दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथून गोव्यात आलेला व मणिपाल इस्पितळात मृत पावलेला एक रुग्ण "स्वाईन फ्लू'बाधित होता हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्याच्या लाळेचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल हाती आल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, ह्रदय व मधुमेहाशी संबंधित काही दोष सदर व्यक्तीत होते. त्यामुळे तिचा मृत्यू "स्वाईन फ्लू'मुळे झाला, असे एवढ्यातच म्हणणे धाडसाचे ठरेल.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys