Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 25 August, 2009

स्वाईन फ्लूमुळे ७२ जणांचा मृत्यू

एक चिमुकली आणि दोन मध्यमववयीन व्यक्तींचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने आता देशातील या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ पर्यंत पोहोचली आहे. हे गेल्या २४ तासांमधील बळी महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत. दरम्यान, दोन आठवड्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतर स्वाईन फ्लूग्रस्त पुण्यातील शाळा-महाविद्यालये आजपासून सुरू झाली. कालपासून देशातील विविध राज्यांमध्ये या रोगाचे शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे सांगितले.
लिव्हरच्या त्रासामुळे अडीच वर्षाच्या एक मुलीला २१ ऑगस्ट रोजी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. अहवाल सकारात्मक आल्यामुळे तिला स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या चिमुकलीचे काल रात्री निधन झाले. तिच्या मृत्युमुळे स्वाईन फ्लूची बळीसंख्या पुण्यात २३, तर महाराष्ट्रात ३९ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी बंगलोरस्थित तिरुमला हॉस्पिटलमध्ये ५० वर्षीय सरोजअम्मा नावाच्या महिलेला भरती करण्यात आले होते. तिला टॅमिफ्लूचा उपचारही सुरू करण्यात आला होता. मात्र, काल रात्री तिचेही निधन झाले, असे हॉस्पिटलमधील सूत्राने सांगितले.
ताप व स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे राजेश उधाड नावाच्या ५२ वर्षीय गृहस्थाला राजकोटमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये २० ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. राजेशचा आज सकाळी मृत्यू झाल्यामुळे या रोगाने गुजरातमध्ये दगावणाऱ्यांची संख्या ७ झाली आहे.
आतापर्यंत कर्नाटकात १३, तामिळनाडू व छत्तीसगढमध्ये प्रत्येकी तीन, दिल्लीत दोन, तर केरळ, गोवा, राजस्थान, उत्तरांचल व हरयाणा येथे प्रत्येकी एक रुग्ण या रोगाने दगावला आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys