अत्याधुनिकीकरण प्रकल्पाचा शुभारंभ - ‘आयएनएस सुमेधाचे’ जलावतरण
वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): गोवा शिपयाडर्ने देशाची सुरक्षेसंदर्भात दिलेले योगदान उल्लेखनीय असून आता उभारण्यात आलेल्या अत्याधुनिकीकरण प्रकल्पामुळे यात भरच पडणार आहे. या शिपयार्डने देशाची सुरक्षाव्यवस्था सुसज्ज करण्यासाठी परिश्रमपूर्वक बांधलेली जहाजे उत्कृष्ट असून येत्या काळात त्यांच्याकडून याहूनही भरीव कामगिरी होईल याचा मला विश्वास आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के.अँटनी यांनी आज काढले.
४०० कोटी रुपये खर्च करून गोवा शिपयार्डने उभारलेल्या अत्याधुनिकीकरण प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्याच्या शुभारंभ सोहळ्याला तसेच शिपयार्डतर्फे भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या ‘आयएनएस सुमेधा’ या तिसर्या जलद गस्तीनौकेच्या जलावतरण समारंभाला श्री. अँटनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत पत्नी एलिझाबेथ अँटनी, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री दिगंबर कामत, भारतीय नौदल कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा, केंद्रीय रक्षा सचिव व्हाइस ऍडमिरल डी. के. जोशी, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले, गोवा शिपयार्डचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक विनीत बक्षी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एलिझाबेथ अँटनी यांनी ‘आयएनएस सुमेधा’ गस्तीनौकेचे जलावतरण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ए. के. अँटनी यांनी गोवा शिपयार्डने आजवर केलेल्या देशकार्याचा गौरव केला. जगात जहाजबांधणी क्षेत्राचा आवाका दिवसेंदिवस वाढत असून गोवा शिपयार्डने हे आव्हान पेलण्यासाठी अद्ययावत बनावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याकामी त्यांना देशाचा सदैव पाठिंबा राहील, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री कामत यांनी गोवा शिपयार्डचे अभिनंदन केले व शिपयार्डचे कार्य राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी डी. के. जोशी तसेच निर्मल वर्मा यांनीही आपल्या मनोगतात गोवा शिपयार्डच्या कार्याची स्तुती केली. नंतर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी गोवा शिपयार्डच्या अत्याधुनिकीकरण प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्याचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले व प्रकल्पाची पायाभरणी केली.
दरम्यान आज जलावतरण करण्यात आलेली ‘आयएनएस सुमेधा’ गस्तीनौका १०५ मीटर लांब असून यावर विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जहाजावर १६ नौदलीय अधिकारी व १०२ नौदलीय कर्मचारी तैनात करण्यात येणार लवकरच हे जहाज देशसेवेत रुजू होणार आहे.
Sunday, 22 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the
most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi
offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.
modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi
Post a Comment