हेडलीच्या डायरीत सापडले नियंत्रकांचे दूरध्वनी क्रमांक
शिकागो, दि. २४ : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याचे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ तसेच जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता हेडलीच्या जप्त केलेल्या डायरीत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांचे टेलिङ्गोन नंबर आढळून आले आहेत. यात पाकिस्तानी सैन्यातील प्रमुख अधिकारी तसेच हल्ल्याचे पाकिस्तानमधून नियंत्रण करणार्यांचे टेलिङ्गोन नंबर आहेत.
हाताने लिहिलेल्या या डायरीची दोन पाने अमेरिकेच्या सरकारी वकिलाने आज न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली. यात पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी मेजर इक्बाल व मेेजर ‘एसएम’ (बहुधा साजीद मीर असावे)चे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत. याच डायरीत जमात-उद-दावाचा सक्रिय कार्यकर्ता अब्दुर रहमान माक्कीसारख्या अनेकांची नावे आहेत. जमात-उद-दावाचा प्रमुख हाङ्गिज सईदनंतर या संघटनेत अब्दुर रहमान हा दुसर्या क्रमांकावरील नेता आहे, हे येथे उल्लेखनीय.
याच डायरीत वासीचे ङ्गोन नंबर देण्यात आले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्या १० अतिरेक्यांना पाकिस्तानातून सूचना देणार्यांत वासी हाही एक प्रमुख होता. याशिवाय डायरीत ज्या इतर लोकांचे नंबर आहेत त्यात जहांगीर, इनाम, तेहसीन, एझाज एम, मन्झूर व खालिद यांची नावे तर आहेतच याशिवाय डायरीत ‘ए. आर.’, ‘एम. एच.’, ‘एम. बी.’ व ‘सी. बी.’ अशी सांकेतिक नावेही आहेत. डायरीतील बहुतांश नंबर हे पाकिस्तानी नागरिकांचेच आहेत. डायरीत दुबईतीलही दोन ङ्गोन नंबर आहेत.
राहुल भट्टचेही नाव
हेडलीच्या याच डायरीतील दोन पानांत हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता महेश भट्ट यांचा मुलगा राहुलचे नाव असून ‘राहुल बी’ या नावाखाली ते देण्यात आले आहे. पीटीआयने यासंदर्भात राहुलशी संपर्क साधला असता, हेडलीच्या डायरीत देण्यात आलेला मोबाईल ङ्गोन नंबर माझाच आहे, याला राहुलने दुजोरा देत म्हटले की, तीन महिन्यांपूर्वीपर्यंत हा नंबर माझाच होता. काही वैयक्तिक कारणांनी मी माझा हा नंबर परत केला होता. या नंबरवर तुम्ही हेडलीशी अखेरचा संपर्क केव्हा साधला असे विचारले असता राहुलने सांगितले की, भारतात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाला होता त्या काळात म्हणजे जवळपास दीड वर्षांपूर्वी आपण हेडलीशी या मोबाईल नंबरवरून बोललो होतो. यानंतर पीटीआयच्या प्रतिनिधीने हेडलीच्या डायरीतील नंबर लावला असता कोणी अक्षय नावाच्या व्यक्तीने तो उचलला व हा विशिष्ट मोबाईल नंबर आपल्याला २० दिवसांपूर्वीच मिळाला असे सांगितले.
५० वर्षे वयाच्या हेडलीने शिकागो येथील न्यायालयासमोर आपली साक्ष दिली आहे. याच हेडलीने मुंबईवर दहशतवादी हल्ले करण्यापूर्वी अनेक महिने मुंबईत राहून कोठेकोठे दहशतवादी हल्ले घडवून आणावयाचे याचे सविस्तर आलेखन केले होते. मुंबईशिवाय भारतात इतरत्रही कोठेकोठे हल्ले करता येतील, याचाही अभ्यास हेडलीने केला होता. मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना आर्थिक, सैन्य व मानसिक मदत करीत होती, हे हेडलीने न्यायालयासमोर कबूल केले आहे.
Wednesday, 25 May 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment