Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 20 March, 2011

लीबियात बंडखोरांवर सैन्याचे हल्ले सुरूच

त्रिपोली/वॉशिंग्टन, दि. १९ : लीबियाचा सर्वेसर्वा मुअम्मर गडाङ्गीने बंडखोरांच्या विरोधात संघर्ष विरामाची घोषणा केल्यानंतरही आज शनिवारी बंडखोरांचा बालेकिल्ला असलेल्या बेनगाझी शहरावर गडाङ्गीच्या सैन्याने जमिनीवरून तसेच हवाई हल्ले केले आहेत. यामुळे बेनगाझी शहरात अनेक ठिकाणी जोरदार स्ङ्गोटाचे आवाज ऐकू आले. गडाङ्गी समर्थक सैनिक हे हल्ले करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या स्थितीकडे बघता अमेरिका व ब्रिटनने म्हटले आहे की गडाङ्गी आपल्याच संघर्षविरामाच्या निर्णयाला हरताळ ङ्गासत आहेत.
बेनगाझी शहरावर आज एका लढाऊ विमानाचा जोरदार आवाज ऐकू आला. त्यानंतर थोड्याच वेळात काही स्ङ्गोटही झाले. या हल्ल्यांना बेनगाझी शहरातील विरोधकही उत्तर देत आहेत. बीबीसीच्या वार्ताहराने वृत्त दिले आहे की, हल्ले करणार्‍या एका जेट विमानाला जमिनीवरून करण्यात आलेल्या हल्ल्यात खाली पाडण्यात आले आहे. लीबियात ‘नो फ्लाय झोन’ जारी करण्यात आल्यानंतरही गडाङ्गीच्या सैन्याकडून अशाप्रकारे हवाई हल्ले केले जात आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे. गडाङ्गीच्या सैन्याला शहरात सहजासहजी प्रवेश करता येणार नाही यासाठी जनता वेगवेगळ्या प्रकारे रस्त्यांत अडथळे निर्माण करीत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गडाङ्गीचे सैन्य बेनगाझी शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर असल्याचे वृत्त आहे. याच प्रत्यक्षदर्शीने असेही सांगितले की आज दोन लढाऊ विमानांनी शहरावर हल्ले केले. याकडे बघूनच अमेरिका, ब्रिटन व त्यांचे मित्र देश लीबियावर हल्ले करण्याची योजना आखत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊस येथे जारी करण्यात निवेदनात म्हटले आहे की, बेनगाझी व इतर शहरांवर आपला ताबा ठेवलेल्या विरोधकांवर गडाङ्गीच्या सैन्याने हल्ला करू नये. अजदाबिया, मिसराटा व जवियाच्या दिशेने गडाङ्गीच्या सैन्याने कूच करू नये, असाही इशारा ओबामा यांनी दिला आहे. लीबियावरील वाढत्या दबावाकडे बघता गडाङ्गी यांनी दोन पावले मागे सरकत एकतर्ङ्गी संघर्षबंदीची घोषणा केली होती. गडाङ्गीच्या सैन्याकडून गडाङ्गी विरोधकांवर जे हल्ले केले जात आहेत ते थांबविण्यासाठी अमेरिका व दोस्त राष्ट्रे यांनी गडाङ्गीविरोधात संघर्षाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असावा. गडाङ्गी यांनी एकतर्ङ्गी संघर्षविरामाची घोषणा केल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर ‘नो फ्लाय झोन’च्या उल्लंघनाचा आरोप केला जात आहे. लीबियावर हल्ला करण्याचा निर्णय झाल्यास ब्रिटन, ङ्ग्रान्सचे सैन्य अरब जगतातील काही सहकारी देशांच्या मदतीने आधी हल्ले करतील असे विशेषज्ञांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------------------------
लीबियावर आता कधीही हल्ले?
त्रिपोली/वॉशिंग्टन, दि. १९ : संयुक्त राष्ट्रांच्या नव्या प्रस्तावांतर्गत लीबियाविरुद्ध लष्करी कारवाई करण्यासंदर्भात अमेरिका, ब्रिटन, ङ्ग्रान्स व अरब देशातील नेते पॅरिस येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे लीबियावर कारवाई होणे अटळ बनले आहे. आज काही फ्रेंच विमाने लीबियाच्या दिशेने घोंगावल्याचे वृत्त आहे. तसे झाले तर या संघर्षामुळे इंधनाच्या जागतिक बाजारपेठेवर त्याचे गंभीर परिणाम संभवतात.

No comments: