Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 February, 2011

इजिप्तच्या उपराष्ट्रपतींवर प्राणघातक हल्ला..!

वॉशिंग्टन, दि. ५
इजिप्तचे उपराष्ट्रपती ओमर सुलेमान यांच्यावर आज (शनिवारी) प्राणघातक हल्ला झाल्याचे ‘ङ्गॉक्स न्यूज’कडून सांगितले जात आहे. या हल्ल्यातून सुलेमान सुदैवाने बचावले असले, तरी त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांचा त्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला नेमका कोठे व कसा झाला याबाबतचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून इजिप्तमधील स्थिती स्फोटक बनत चालली आहे. राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचे समर्थक आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे लाखो नागरिक यांच्यात रोजच धुमश्चक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, ओमर सुलेमान यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्तामुळे आखाती देशांतही खळबळ उडाली आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी स्थिती अत्यंत बिकट होत चालल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणी आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही आणि यापुढे या प्रश्नात लक्षही घालणार नाही, अशी संतप्त भूमिका व्हाईट हाऊसचे वृत्तपत्र विभाग सचिव रॉबर्ट गिब्ज यांनी घेतली आहे.
मुबारक यांनीच जनक्षोभ थांबवण्यासाठी उपराष्ट्रपती म्हणून ओमर सुलेमान यांची नियुक्ती केली होती, असे अमेरिकन ङ्गॉक्स न्यूजतर्ङ्गे सांगण्यात आले आहे. ओमर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर जनक्षोभ शमवणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
सत्ता सोडणार नाहीच ः मुबारक
दरम्यान, ‘घरी जा’ हा लष्कराचा आदेश धुडकावून हजारोंच्या संख्येने राजधानी कैरो येथील ताहरीर चौकात जमा झालेल्या इजिप्तच्या नागरिकांनी शुक्रवारच्या नमाजपठणानंतर अध्यक्ष मुबारक यांना ’चालते व्हा’ असा निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेसह जगभरच्या नेत्यांनीही मुबारक यांना हा पेचप्रसंग शांततेत मिटविण्याचा सल्ला दिला. मात्र, तो धुडकावून मुबारक यांनी पायउतार होण्यास नकार दिला आहे. ‘मी आत्ता सत्ता सोडली, तर इजिप्तमध्ये अराजक निर्माण होईल,’ अशी दर्पोक्ती त्यांनी केली आहे.
ओबामा प्रशासनाने मध्यस्थीसाठी उपाध्यक्ष ओमर सुलेमान यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्यानंतर, ’मुस्लिम ब्रदरहूड’ या प्रमुख विरोधी पक्षानेही मुबारक सत्ता सोडत असतील तर सशर्त चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, मुबारक यांच्या हट्टामुळे गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेला पेच आणखी चिघळला आहे. जनतेच्या उठावाचे प्रमुख केंद असलेल्या ताहरीर चौकात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी गेला आहे.
शुक्रवारी ‘मुबारक चालते व्हा’ अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने नागरिक ताहरीर चौकात जमा झाले. नमाजपठणानंतर राष्ट्रध्वज ङ्गडकावत, सरकारविरोधी घोषणा देऊन त्यांनी चौक दणाणून सोडला. या चौकात रात्रभर राहिलेल्या नागरिकांसाठी काही जणांनी ब्रेड, अन्न, ङ्गळे आणि पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. हा संघर्ष तडीला न्यायचाच, अशा निर्धाराने आंदोलक ताहरीर चौकात जमा झाले होते. इजिप्तचे संरक्षणमंत्री व उपपंतप्रधान हुसेन तंतावी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसह दुपारी ताहरीर चौकाला भेट दिली.

मी कंटाळलोय... : मुबारक

इजिप्तमधील उठावाला सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष होस्नी मुबारक (वय ८२) यांनी प्रथमच ’एबीसी न्यूज’ला मुलाखत दिली. त्यांनी नंतर आपण आता सत्तेला कंटाळलो असून, लवकरच पायउतार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आत्ता विरोधक मागणी करीत आहेत म्हणून आपण लगेचच सत्ता सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावले. ’लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही. मी सध्या देशाची काळजी करतो आहे. पण मी आत्ता सत्ता सोडली, तर माझा देश अराजकाच्या गर्तेत लोटला जाईल,’ असे उद्गार त्यांनी काढले. ‘
मी आता कंटाळलो आहे. मी गेली ६२ वर्षे सार्वजनिक सेवेत आहे. आता पुरे झाले. मला निवृत्त व्हायचे आहे. मी इतर अध्यक्षांसारखा देश सोडून पळून जाऊ शकलो असतो. पण मी तसे केले नाही,’ असे मुबारक यांनी सांगितले.
मुबारक यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून रस्त्यावर आलेल्या लोकांनी क्षोभाचा उद्रेक किती मोठा असू शकतो हे दाखवून दिले आहे. या उठावाचा केवळ राजकारणावरच नव्हे, तर अर्थकारणावरही परिणाम झाला असून, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी बराच वेळ लागेल, अशी चिन्हे आहेत.
पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय यांसाठी इजिप्तमधील वातावरण पोषक आहे. त्यामुळे विविध देशांतील मंडळी येथे येऊन व्यवसाय करतात. नागरी उठावामुळे हा व्यवसाय आता खंडित झाला आहे. अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. येऊ घातलेले प्रकल्प थांबले आहेत. सर्व प्रकारचा व्यापार-उदीम दहा दिवस बंद झाल्याने अर्थव्यवस्थाच एक प्रकारे ठप्प झाली आहे. याचा केवळ इजिप्तवरच नव्हे, तर शेजारील देशांवरही परिणाम होत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास शेजारील देशांमध्येही आर्थिक अरिष्ट येऊ शकते.
या सार्‍यांतून ङ्गिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याची क्षमता इजिप्तमध्ये आणि तेथील नागरिकांमध्ये आहे. मात्र, हे नेमके कधी होईल हे आताच सांगणे अवघड आहे. कारण नागरिकांनीच संघर्षाचा रस्ता स्वीकारला आहे. ते आता मागे हटण्याच्या स्थितीत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना मुबारक नको आहेत. मुबारक जाऊ देत, मग आम्ही पुढचे पाहून घेऊ, असे ते सांगत आहेत. आज ताहरीर चौकात प्रचंड गदीर् झाली होती. मुबारकही जिद्दीला पेटले आहेत. त्यांच्यावरील दबाव वाढत आहे. आंतरराष्ट्रीय समूदायाकडूनही तो येऊ लागला आहे. तरीही सत्ता सोडण्यास ते राजी नाहीत. त्यामुळे इजिप्तमध्ये शांतता कशी निर्माण होईल, हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहे.

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात
आता करुणानिधींचे नाव
नवी दिल्ली, दि. ५
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा आणि त्यांच्या दोन साथीदारांना सीबीआयनं अटक केल्यानंतर, आता या चक्रात तामीळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधींचेही नाव अडकताना दिसत आहे. जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम् स्वामी यांनी आज सीबीआय कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत करुणानिधी यांचे नाव आरोपी म्हणून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करुणानिधी यांच्यासोबत आरोपींच्या यादीत आणखी अनेक नावं समाविष्ट करण्यात यावीत, अशी आग्रही विनंती स्वामींनी न्यायमूर्ती प्रदीप चड्डा यांना केली आहे. स्वामी यांनी याआधी दाखल केलेल्या तक्रारीत ए. राजा यांचे नाव होते. आता २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी करुणानिधींच्या विरोधात तक्रार झाल्याने हे प्रकरण आणखी नवे वळण घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काळा पैसा प्रकरणातील
१५ जणांची नावे जाहीर!
नवी दिल्ली, दि. ५
जर्मन बँकांमध्ये काळा पैसा लपवून ठेवलेल्या १५ व्यक्तींची नावे ‘तहलका’ मासिकाने गुरुवारी प्रसिद्ध केली आहेत. या नावांची यादी भारत सरकारकडे १८ मार्च २००९ रोजी सोपवण्यात आली होती. तथापि, जर्मन सरकारने घातलेल्या अटींमुळे ही यादी गुप्त ठेवण्यात आली होती. ती तहलकाने ङ्गोडल्यामुळे केंद्रीय अर्थखात्यात खळबळ उडाली आहे.
वास्तविक, भारत सरकारला मिळालेल्या यादीतील सर्व नावांची चौकशी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्ङ्गे सुरू होती. हा तपास अंतिम टप्प्यात आला होता. त्यात दोषी आढळणार्‍या व्यक्ती आणि संस्थांवर, आयकर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होणार होती. मात्र, त्याआधीच तहलका मासिकाने १५ नावे उघड करून केंद्र सरकारला ‘जोर का झटका’ दिला आहे. सरकारच्या यादीत दोन बड्या असामींची नावे असल्याचे समजते. त्याबद्दल तहलकाने कमालीची गुप्तता राखली आहे.
तहलकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत १२ व्यक्तींची नावे आहेत तर बाकी तीन नावे ही व्यापारी संस्थांची आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या महितीनुसार ही नावे प्रामुख्याने चेन्नईस्थित एका व्यापारी परिवारातील असून अन्य व्यक्ती हिरे व्यापारी आहेत.
या यादीत मनोज धुपेलिया, रुपल धूपेलिया, मोहन धूपेलिया, हंसमुख गांधी, चिंतन गांधी, दिलीप मेहता, अरुण मेहता, अरुण कोचर, गुणवती मेहता, रजनीकांत मेहता, प्रबोध मेहता, अशोक जयपुरीया या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच राज ङ्गाऊंडेशन, उर्वशी ङ्गाऊंडेशन आणि अंब्रुनोवा ङ्गाऊंडेशन या संस्थांचाही त्यात समावेश आहे.
तहलकाने नावे घोषित करण्यापूर्वी या प्रत्येक व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी समोर आले नाही. त्यानंतर ही नावे तहलकाने उघड केली. आणखी एका बड्या नेत्याचे आणि एका मोठ्या उद्योग समूहाच्या अध्यक्षाचे नाव या यादीत असून त्याबद्दल पूर्ण माहिती गोळा करेपर्यंत ही नावे जाहीर करण्यात येणार नसल्याचे तहलकाने स्पष्ट केले आहे.

No comments: