Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 February, 2010

साटेलोटे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई : बस्सी

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): अंमलीपदार्थ विरोधी पथकाची गोपनीय कागदपत्रे "डुडू' याच्या बंगल्यावर सापडल्याच्या घटनेची पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात कोणताही अधिकारी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महासंचालक बस्सी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
अंमलीपदार्थ तस्करी किंवा व्यवसाय अजिबात सहन केला जाणार नसल्याची गर्जना पोलिस महासंचालकांनी केली. दिल्ली येथील बैठकीनंतर गोव्यात दाखल झालेल्या पोलिस महासंचालकांनी गोव्यात येताच सर्वप्रथम अटक करण्यात आलेला ड्रग माफिया "डुडू' याचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया "डुडू'ला तब्बल १२ वर्षानंतर अटक करण्याचे धाडस करणाऱ्या पथकाचे अभिनंदन करत त्यांना बक्षीस जाहीर केले.
दरम्यान, "डुडू' याची आज दिवसभर चौकशी करण्यात आली असून याद्वारे धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. "डुडू' वापरत असलेले वाहन सॅंट्रो कार ही सहा महिन्यांपूर्वी भाड्याने चालवायला घेतली होती. तरीही या वाहनाची वाहतूक खात्यात अद्याप नोंदणीच झालेले नाही, अशी माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. २००६ साली सदर वाहन मडगाव येथील एका "ब्रोकर'ला विकण्यात आले होते. त्यानंतर ते वाहन कळंगुट येथील एका व्यक्तीने विकत घेतले, त्याने त्या वाहनाची नोंदणी न करताच "डुडू' याला वापरण्यासाठी दिले, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सहा महिन्यापूर्वी "डुडू' याने नवीकोरी ब्रीझ ही दुचाकी विकत घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

No comments: