Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 May, 2009

आचारसंहिता शिथिल; लोकांना मोठा दिलासा

पणजी, दि. ८ : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता २८ मेपर्यंत लागू राहणार असल्याने निवडणूक आयोगाने काही प्रकरणांत ती शिथिल केली आहे. त्यामुळे लोकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळवण्यासाठी २७५ पेक्षा जास्त प्रस्ताव आले व त्यातील २६० हून अधिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तातडीने गरजेचे नसलेले व दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजनांचे प्रस्ताव मात्र अमान्य करण्यात आले. आचारसंहिता लागू झाल्यापासून अनेक योजना व प्रकल्पांची कामे रखडली होती. तथापि, आता आयोगाने ती शिथिल करून कल्याणकारी आणि सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या प्रस्तावांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी विविध खातेप्रमुखांनी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांंची दखल घेऊन तसा खुलासा दैनिकांतून करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव प्रलंबित असल्यास तसे सरकारच्या निदर्शनाला आणून द्यावे. त्यासाठी खातेप्रमुखांनी श्रीमती दीपाली नाईक (ओएसडी मोबाईल क्र. ९७६३८२०१४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

No comments: