Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 May, 2009

विश्वजित प्रकरणी आज सुनावणी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील व सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही प्रकरणे उद्या ५ रोजी सुनावणीस येणार आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासंबंधीचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रकरणावर अवलंबून आहे. संसदीय सचिवपदे रद्द झाल्यानंतर आता उर्वरित तीन नेत्यांना दिलेला कॅबिनेट दर्जाही रद्द करावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली असून या नेत्यांची भवितव्यही या प्रकरणावर अवलंबून आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ऍड.रॉड्रिगीस यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास हयगय केल्याने जुने गोवे पोलिस निरीक्षकाविरोधातील मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदार आग्नेल फर्नांडिस,डॉ.विल्फ्रेड डिसोझा व एदुआर्द फालेरो यांच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने या दोन्ही प्रकरणी सरकारची कसोटीच लागणार आहे.

No comments: