Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 November, 2008

माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे निधन

नवी दिल्ली, दि. २७ : माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे गुरूवारी दुपारी अपोलो रूग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते किडनी तसेच हृदयविकारामुळे आजारी होते.
कॉंग्रेसच्या मदतीशिवाय स्थापन झालेल्या केंद्र सरकारमध्ये व्ही.पी.सिंग यांच्या सरकारचे नाव घ्यावे लागेल. दोन डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली होती. ओबीसी आरक्षण अंमलात आणत असल्याच्या घोषणेनंतर देशाचा राजकारणाचा चेहरा पालटला. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने १० नोव्हेंबर १९९० रोजी अवघ्या एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना पंतप्रधानापदावरून पायउतार व्हावे लागले हेाते.
दरम्यान, व्ही.पी.सिंग यांना गेली अनेक वर्षे जडलेल्या किडनीच्या विकारामुळे वारंवार डायलिसीस करून घ्यावे लागत होते. तथापि, जीवघेणा आजार असूनही ते सतत कार्यरत होते. या वयातही देशभर प्रवास करीत असत.

No comments: