Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 28 November, 2008

दवर्ली पंचायत सचिवास लांच प्रकरणी सक्तमजुरी

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी लांचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवलेला दवर्ली दिकरपाल पंचायतीचा तत्कालीन पंचायत सचिव अतुल नायक याला आज १ वर्ष सक्त मजुरी व वीस हजार रु. दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास त्याला आणखी एक महिना सक्तमजुरीची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. त्याला गेल्या १३ रोजी त्यांनी दोषी ठरवण्यात आले होते. २००१-२००२ मध्ये हा लांच घेण्याचा प्रकार घडला होता.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार नावेली येथील एका बांधकाम कंपनीचे व्यवस्थापक सूरज डिसोझा यांच्याकडे आरोपीने सदर पंचायत क्षेत्रात उभ्या राहाणार असलेल्या "रोजा मिस्किता अपार्टमेंट' नामक प्रकल्पाला वास्तव्य दाखला देण्यासाठी १५ हजार रु.ची लांच मागितली होती. शेवटी तो १० हजारांपर्यंत तडजोड करण्यास तयार झाला होता.
तथापि, आपल्या प्रकल्पाचे सर्व दस्तेवज व्यवस्थित असताना आपण लांच कशाला द्यावयाची असा प्रश्र्न पडलेल्या सूरज यांनी गुन्हा अन्वेषणाकडे तक्रार केली होती. त्यांनुसार आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचून पोलिसांनी अतुल याला मुद्देमालासह पकडले होते. या प्रकरणी १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक लवू मामलेकर व नंतर चंद्रकांत साळगावकर यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

No comments: