Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 October, 2008

पाळी मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ ला

पणजी,दि.२२(प्रतिनिधी): पाळी मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या २६ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली.यासंबंधी आज २२ ऑक्टोबरपासून उत्तर गोव्यात आचारसंहीता लागू करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले असून गोवा राज्यासंदर्भात ही आचारसंहिता केंद्र सरकारलाही लागू होईल,असेही आदेशात म्हटले आहे.
गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. पाळीचे आमदार प्रा.गुरूदास गावस यांचे ४ जून २००८ रोजी निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.माजी आरोग्यमंत्री तथा भाजपचे माजी आमदार डॉ. सुरेश आमोणकर यांना पराभूत करून कॉंग्रेसचे उमेदवार प्रा.गावस पहिल्यांदाच या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. तथापि त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांना एक वर्षही आमदार म्हणून कार्य करण्याची संधी लाभली नाही.प्रा.गावस यांच्या निधनानंतर आता कॉंग्रेसमध्ये त्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा या मतदारसंघासाठी केलेली नाही.
--------------------------------------------------------------
२९ रोजी मतमोजणी
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार १ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. ८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून १० रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १२ रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २६ रोजी मतदान होईल. मतमोजणी २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

No comments: