Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 24 October, 2008

आठवड्याभरात इंधनाचे भाव कमी होणार : देवरा

नवी दिल्ली, दि.२३ : जागतिकस्तरावर कच्च्या तेलाचे भाव उतरल्यामुळे येत्या आठवड्याभरात आपल्याही देशातील इंधनाचे भाव कमी करण्याचा विचार सरकार करीत आहे, असे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी आज लोकसभेत सांगितले. इंधनाचे भाव कमी झाले तर ती सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीची भेट ठरणार आहे.
या संदर्भात सध्या अभ्यास सुरू आहे आणि येत्या आठवड्याभरात तशी घोषणा केली जाईल, असेही देवरा म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात देवरा यांनी ही माहिती दिली. जागतिक स्तरावर आलेल्या मंदीमुळे कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. परिणामस्वरूप त्याचे भावही खाली आले असून आज जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा एक पिंप ६७ डॉलरचा झाला आहे. १४७ डॉलरवर प्रतिपिंपावरून घसरून ही किंमत ६७ डॉलरपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळेच संपुआ सरकारने भाव कमी करण्याच्या आपल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि इंधनाचे दर कमी करावे, अशी मागणी सदस्यांनी केली होती.
सदस्यांच्या या मागणीवर बोलताना देवरा यांनी आठवड्याभरात किमती कमी होण्याचे संकेत दिले आहे. इंधनाच्या किमती कमी झाल्यास महागाईचा दर कमी होण्यासाठीही त्यामुळे मदत मिळेल, असेही देवरा यांनी म्हटले आहे. बसपाचे सदस्य ब्रजेल पाठक यांनी सरकारला विचारणा केली की, शेतकऱ्यांना नि:शुल्क डिझेल उपलब्ध करून दिले जाणार आहे काय. त्यावर देवरा यांनी सांगितले की, सध्या विविध पेट्रोलियम पदार्थांवर सबसिडी देण्यात आली आहे. या उत्तरावर बसपा सदस्याचे समाधान झाले नाही. पेट्रोलियम मंत्र्यांच्या असमाधानकारक उत्तरामुळे नाराज झालेल्या बसपा, डाव्या आणि रालोआच्या सदस्यांनी त्यांच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून बहिर्गमन केले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचाही दर हळूहळू खाली घसरू लागला आहे. ११ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर ११.०७ होता. त्याआधी हा दर ११.४४ होता. गेल्या आठवड्यात प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाईचा दरही खाली येण्यास मदत झाली आहे, असे उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.
१६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्याअखेर देशातील महागाईचा सर्वोच्च दर १३.८२ टक्के नोंदला गेला होता. या आधीचा विक्रम १४.४० टक्के होता.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys