Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 October, 2008

नेर्लोन आल्बुकर्क यांची जबानी

ऍड. आयरिश व प्रजल हल्ला प्रकरण
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - ऍड. आयरिश रॉड्रिगीस व प्रजल साखरदांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी माजी पोलिस उपनिरीक्षक नेर्लोन आल्बुकर्क घटनास्थळी उपस्थित असल्याने पणजी पोलिसांनी त्यांची जबानी नोंद करून घेतली. नेर्लोन यांनी आपल्या जबानीत काय सांगितले, ते उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
यापूर्वी स्कार्लेट खून प्रकरणात निलंबित झालेले माजी उपनिरीक्षक आल्बुकर्क त्या रात्री अशोक बार ऍंड रेस्टॉरंटमध्ये का गेले होते, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधून अटक करून आणलेल्या तरुणांचीही ओळख परेड यावेळी श्री. आल्बुकर्क यांच्यासमोर करण्यात आली आहे. त्या तरुणांना आपण ओळखले नसल्याचे यावेळी नेर्लोन आल्बुकर्क यांनी आपल्या जबानीत सांगितल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
दि. १४ फेब्रुवारी २००८ रोजी ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग या तरुणीचा खून झाल्यानंतर तपास कामत हलगर्जीपणा केल्याच्या आरोप करताना "ऊठ गोंयकारा' या संघटनेचे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी उपनिरीक्षक आल्बुकर्क यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली होती. त्याचप्रमाणे आल्बुकर्क यांचे या प्रकरणात साटेलोटे असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. त्यामुळे ऍड. आयरिश यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी आल्बुकर्क स्वतःहून घटनास्थळी आले होते की, त्यांना कोणी दूरध्वनी करून बोलावून घेतले होते, या दृष्टिकोनातून सध्या पणजी पोलिस चौकशी करीत आहे.
महाबळेश्वर येथून अटक करून आणलेल्या पाचही संशयितांकडून अद्याप कोणतेच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले नाही, असे पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. तपासाच्या आखणीनुसार कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास या हल्ल्यामागील संपूर्ण गुपित उलगडणार असल्याचे उपअधीक्षक तावारीस म्हणाले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys