Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 October, 2008

म्हापशात 'बंद'ला हिंसक वळण

म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): म्हापसा शहरात "बंद'ला आज हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारत हुनमंत (बाळू) वारंग, स्वप्निल शिरोडकर, श्री. शेटगावकर असे तिघे जखमी झाले. तसेच सुमारे ३०० लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संतप्त जमावाने कदंबच्या तीन बसेसच्या काचा फोडल्या. त्यामुळे दिवसभर शहरात तणावपूर्ण वातावरण होते.
खोर्ली येथील देवी सातेरीच्या मंदिरात सुमारे साठ भाविकांनी सकाळी आरती केली. नंतर म्हापसा टॅक्सी स्टॅंडवर सामूहिक आरती करून मारुती मंदिरसमोर लोक जमायला सुरवात झाली. म्हापसा बाजार पेठ, हॉटेल्स, आस्थापने पूर्ण बंद होती. त्यातच सकाळी दुधाची गाडी न आल्याने लोकांना गोवा डेअरीचे दूध मिळू शकले नाही. परिणामी लहान मुलांचे हाल झाले. म्हापसा बाजारपेठ, मासळी बाजार, भाजी मार्केट बंद असल्याचे पाहून
अन्य कोणीच आपली दुकाने उघडण्याचे धाडस केले नाही. सकाळी आठ वाजल्यावर बाहेर गावांहून येणाऱ्या कदंबच्या गाड्या येण्यास सुरवात झाली. तथापि, परंतु कदंब स्टॅंडवर या गाड्या प्रवेशद्वारावरच रोखून प्रवाशांना खाली उतरण्यास भाग पाडले गेले. नंतर रोमन फूड, पोशाख, व नवतारा हॉटेल्स काही काळ उघडे होते. ते दगडफेक करून बंद पाडण्यात आले. नवतारा हॉटेलचे मालक कार्लुस तावारो म्हणाले, आपण २२ वर्षे या व्यवसायात आहोत. या कालवधीत आपण कधीच आपले हॉटेल बंद ठेवले नव्हते. तुम्ही आपले हॉटेलची मोडतोड केलीत आणि आता हॉटेल बंद करा म्हणून का सांगता तेव्हा त्यानी पोलिस बंदोबस्त मागवला व हॉटल सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच लोकांनी हॉटेलवर मोर्चा नेला व ते बंद ठेवण्याची मागणी केली. तेव्हा पोलिसांना लाठीमार करावा लागला. लाठीमार करताच वातावरण चिघळले तेव्हा लोकांनी रस्त्यावर टायर जाळले आणि रस्त्यावर अडथळे निर्माण केले. पोलिसांनी नवतारा हॉटेलपाशी बंदोबस्त ठेवला होता. लोक ते हॉटेल बंद करण्याची मागणी करत होते व दगडफेक झाल्याने हॉटेलचे नुकसान झाले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता गैरसमजातून व स्वरक्षणासाठी सौम्य लाठीमार करावा लागल्याबद्दल पोलिसांनी जनतेची क्षमा मागितली. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानंतर मात्र नवतारा हॉटेल बंदच होते.
सकाळी ग्रीनपार्क हॉटेलजवळ सुमारे १०० ते १५० लोकांनी जमून महामार्गावर धावणारी वाहने रोखली. त्यावेळी काही वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. परिणामी
११ ते १२ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व म्हापसा पोलिसात आणून त्यांना कोठडीत टाकले. त्यांच्याविरुद्ध १५१ कलमाअंतर्गत गुन्हा नोदवण्यात आला. त्यांना अटक का केली व त्यांची तातडीने सुटका करा या मागणीसाठी म्हापसा पोलिस ठाण्यासमोर ३०० ते ४०० लोकांचा जमाव जमला होता. तेथेच त्यांनी सामूहिक आरती म्हणण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिस स्थानकावर आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष सौ. स्नेहा भोबे, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, नगरसोविका वैशाली फळारी, उज्ज्वला कांदोळकर, मिलिंद आर्लेकर, रोहन कवळेकर उपस्थित होते. नंतर अटक केलेल्या ११ जणांना न्यायालयात हजर करून प्रत्येकाची तीन हजार रुपयांच्या हमीपत्रावर सुटका करण्यात आली. मग म्हापसा पोलिस ठाण्यावर जमलेला जमाव पांगण्यात सुरवात झाली. नंतर हा मोर्चा नवतारा हॉटलेकडे वळला. हे हिंसक प्रकार वगळता बंद सुरळीत पार पाड पडला. नगरसेवक आशिष शिरोडकर, जीवन मयेकर, संजय वालावलकर, अच्युत वेर्णेकर, अजय पडते, सदाशिव सामंत, सिद्धेश सर्जेराव, नारायण सावंत, विवेकानंद हळर्णकर, परेश रायकर याप्रसंगी उपस्थित होते.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys