Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 August, 2008

एक कोटी प्रकरणाची सीडी बोलू लागली...!

रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि.3 - "इसमें इतनी परेशानी की क्या बात है! 10 मिनट बैठिएगा और 10 मिनट मे बात हो जाएगी और बात खतम! फोन से क्या बात करना, फोन से क्या बात होगी!'' हे संभाषण आहे समाजवादी नेते रेवतीरमणसिंग यांचे.
सीएनएन-आयबीएन या चॅनेलने मागील 11 दिवसांपासून दाबून ठेवलेल्या एक कोटी लाच प्रकरणातील सीडीचे काही अंश आज बाहेर आले. लोकसभेतील मतदानापूर्वी आदल्या दिवशी रात्री उशिरा सपा खासदार रेवतीरमण सिंग भाजप खासदार अशोक अर्गल यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी झालेले हे संभाषण.
रेवतीरमण सिंग : अरे यार हम है ना चलो तो, हम है ना आप चलो तो! हम है ना आपके साथ!
चलो तो! आपके सामने बात करता हूँ। हम बात कर चुके है। तभी तो यहॉं आये है।
महावीर सिंग (भाजप) : नही और बात थी ।
रेवतीरमण : क्या बात है बतावो ।
महावीर सिंग (भाजप) : अमाऊंट की तो बात नही हुई होगी ।
रेवतीरमण : अमाऊंट का तो हमने बात नही किया है । अमाऊंट की तो आपके सामने बात होगी ।
फग्गन सिंग (भाजप) : नही वो बात नही है । देखिये बात होने से इन्सान को आयडीया हो जाता है ।
रेवतीरमण सिंग : इसलिए तो कह रहा हूं , चलिए आमने-सामने बात हो जाएगी ।
एक कोटीचे हस्तांतरण
संजीव सक्सेना (अमरसिंगांचे पी. ए.) : आपल्या मोबाईलवरून बोलण्याच्या प्रयत्नात असतात.
महावीर सिंग : अमरसिंगजी हो?
अशोक अर्गल : हॉं ।
महावीरसिंग : यह पुरा है ।
संजीव : मैने काऊंट नही किया है, जैसे दिया वैसेही ले आया ।
महावीर सिंग (अमरसिंगांना) : हॅलो, नमस्कार, हम सुबह नही आ पाये थे, क्योंकी हमारे सीएमसाहब आ गये थे । (वसुंधरा राजे सकाळी दिल्लीत आल्या होत्या.)
संजीव (अमरसिंगांना) : यस सर! मै संजीव बोल रहा हूँ। हां अशोकजी और एक महावीर भगौराजीसे बात करवाता हूँ । लिजीए बात किजीए ।
संजीव सक्सेना मोबाईल अशोक अर्गल यांच्या हाती देतात.
अर्गल (भाजप) : एक करोड प्राप्त हो गया । एक पुरा प्राप्त हो गया । एक करोड प्राप्त हो गया है । जी ठिक है, मालूम है, ठिक है सर...
चौकशी समितीला सादर
सीडीतील हे संभाषण भाजप खासदारांनी सांसदीय चौकशी समितीला आज सादर केले. यामुळे या संभाषणाला गंभीर मानले जाते. कारण, भाजप खासदारांनी बनावट संभाषण सादर केल्यास संपूर्ण प्रकरण भाजपवरच उलटू शकते. आज ज्या आत्मविश्वासाने भाजपने हे संभाषण चौकशी समितीला सादर केले त्यावरून एक कोटीची ही सीडी भाजपच्या ताब्यात आली असल्याचे मानले जाते कारण, सीडी असल्याशिवाय त्या सीडीतील संभाषण भाजपला मिळू शकले नसते.
सीएनएन हादरले
एक कोटीच्या प्रकरणातील ही सीडी भाजपला मिळाल्याचे स्पष्ट होताच सीएनएन चॅनल हादरले.
ही सीडी कशी व कुठून बाहेर पडली याची चौकशी सीएनएनमध्ये सुरू झाली असल्याचे समजते. भाजप वर्तुळात या सीडीची माहिती चार दिवस आधीच प्राप्त झाली होती. मात्र नेमके सूत्र कळू शकले नाही.
अमरसिंग संतप्त
सीडीचे वृत्त बाहेर येताच अमरसिंग संतप्त झाले आहेत. भाजपने केवळ सीडीच मिळविली नाही तर, आपले सचिव संजीव सक्सेना यांच्या मोबाईचे संपूर्ण रेकॉर्डही मिळविले आहेत. यामुळे अमरसिंग यांचा संताप वाढला आहे. विशेष म्हणजे, संसदीय समितीची दुसरी बैठक उद्या सोमवारी होत असून, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या बैठकीत सभापतींकडे ही सीडी सादर केली जाणार आहे.

No comments: