Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 July, 2011

रॅगिंगबाबत खबरदारी

गोमेकॉत ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे
आठ दिवस वर्ग बंद

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयात या वर्षी विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्यास महाविद्यालयाच्या ‘डीन’वरच कारवाई करणार असल्याचे संकेत सरकारने महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे याची खबरदारी म्हणून आता महाविद्यालयाने ज्येष्ठ विद्यार्थ्याचे वर्ग आठ दिवस रद्द करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेलमध्ये रॅगिंग केल्याने ६ विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. यावर्षी प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचे रॅगिंग होऊ नये, यासाठी आठ दिवस ज्येष्ठ विद्यार्थ्यांना महाविद्यालयापासून लांब ठेववे जाणार आहे.
सुरुवातीच्या पहिले आठ दिवस विद्यार्थी महाविद्यालयाच्या परिसराला नवे असता. त्यामुळे ज्येष्ठ विद्यार्थी याची संधी घेऊन त्याचे रॅगिंग करतात. त्यामुळे या कालावधीत नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयापासून लांब ठेवल्यास रॅगिंगचा प्रकार टाळता येणार, असा दावा महाविद्यालयाच्या प्रशासनाने केला आहे. मात्र, या रणनीतीत महाविद्यालय किती यशस्वी होते, हे पाहण्याजोगे ठरणार आहे. १ ते ८ सप्टेंबर या दरम्यान वरिष्ठ विद्यार्थ्याचे वर्ग रद्द केले आहेत.
गेल्यावर्षी विद्यार्थ्यांची कॉपी पकडण्यात आली होती. मात्र, याही वर्षी विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आले. कॉपी प्रकार थांबवण्यात महाविद्यालयात यश आले नाही. परंतु, रॅगिंगचा प्रकार थांबवण्यात यश येते का, याकडे सरकारचेही लक्ष लागलेले आहे.

No comments: