Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 July, 2011

फोटो ओळी - पंजाबमधील भाकरा नानगल धरण आता बडी धरणे अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर धरणांच्या परिसरात अतिसावधानतेचा इशारा नवी दिल्ली, दि. १६ भारताला जास्तीत जास्त कमकुवत आणि अस्थिर करण्यासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ व ‘जमात

आता बडी धरणे अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
धरणांच्या परिसरात अतिसावधानतेचा इशारा

नवी दिल्ली, दि. १६ : भारताला जास्तीत जास्त कमकुवत आणि अस्थिर करण्यासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ व ‘जमात-उल-दावा’ या दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी आता भारतातील बड्या धरणांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याचे वृत्त येऊन थडकले आहे. दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर भारतातील प्रमुख धरणे असल्याची माहिती ‘इंटेलिजन्स ब्युरो’ या भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
सतलज नदीवर असलेले भाकरा नानगल धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील मोठ्या भूप्रदेशाला वीजपुरवठा केला जातो. देशातील सर्वांत मोठे असलेले हे धरण स्ङ्गोटाद्वारे ङ्गोडून भारतात हाहाकार उडवून देण्याची दहशतवाद्यांची योजना आहे. कारण हे महाकाय धरण फुटले तर भारतात भयंकर पूर येईल. देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर त्यामुळे संकटात सापडेल. साहजिकच गुप्तचरांनी ही माहिती देताच या धरणाच्या परिसरात अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पहिल्या हल्ल्यात भाकरा नानगल धरण ङ्गोडल्यानंतर भारतातील अन्य मोठ्या धरणांमध्येही स्ङ्गोट करण्यासाठी दहशतवादी योजना तयार करत आहेत. घातपाताचा हा नवा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी दहशतवाद्यांनी तरुणांना भरती करायला सुरुवात केली आहे. धरण ङ्गोडण्यासाठी नवनियुक्त सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे. हा सारा तपशील ‘स्फोटक’ असल्यामुळे केंद्र सरकारने ही माहिती मिळताच धरणांचे रक्षण करणार्‍या पथकांना सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
अर्थात, अतिसावधानातेचा इशारा देण्यात आल्यानंतर केवळ काही दिवस सावधगिरी बाळगून नंतर त्यात शिथिलता येऊ नये, अशी अपेक्षा देशवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. कारण नुकत्याच झालेल्या मुंबई बॉंबस्फोट मालिकेद्वारे आपले अस्तित्व देशविरोधी शक्तींनी नव्याने दाखवून दिलेले आहे.

No comments: