Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 11 July, 2010

मिकीं यांचा छळ आरंभल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आरोप

सरकारचा कडाडून निषेध

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्यूप्रकरणी चौकशीला पूर्ण सहकार्याचे आश्वासन देऊनही पोलिसांकडून माजी पर्यटनमंत्री तथा आमदार मिकी पाशेको यांचा छळवाद सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेकेला हे. या अनुषंगाने पक्षाने तीव्र निषेधही केला आहे. नादिया आत्महत्या प्रकरणात मिकींना यांना जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचाही संशयही आता राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे.
नादियाच्या संशयास्पद मृत्यूच्या सखोल चौकशीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वागतच करतो; पण ही चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी व मिकींची विनाकारण सतावणूक होऊ नये, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांची भूमिका पाहता त्यांना मिकींच्या चौकशीपेक्षा त्यांच्या पोलिस कोठडीतच जास्त रस असावा, असा संशय बळावतो, असेही जुझे यांनी म्हटले आहे.
नादियाच्या मृत्यूमागील सत्य लवकरात लवकर उघड होण्यासाठी पोलिसांना सर्व ते सहकार्य मिकींकडून दिले जाईल, असा विश्वास करून विनाकारण राजकीय आकसापोटी त्यांची सतावणूक होता कामा नये, अशी आग्रही मागणी या पत्रकाव्दारे करण्यात आली आहे.

No comments: