Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 June, 2009

ठाणे-सत्तरीत ४० लाखांची हानी

संतोबा देसाईंच्या फॅक्टरीला आग
वाळपई, दि. २१ (प्रतिनिधी) : वाळपई ठाणे येथील सुलक्षणा संतोबा देसाई यांच्या मालकीच्या विटांच्या फॅक्टरीला आग लागून ४० लाखांचे नुकसान झाले.आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास फॅक्टरीच्या कामगारांनी आग लागल्याचे पाहिले व मालकांना सांगितले. आगीचे लोट ३ कि.मी.अंतरावरून दिसत होते. वाळपई अग्निशामक दलाला फॅक्टरीला आग लागल्याचे दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले. अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन फॅक्टरीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.आगीत १००० चौ.मी. शेड जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासल्याने आयत्यावेळी रिवे आचरेकर फार्म हाउसमधून १ लाख लीटर पाणी आणण्यात आले. रात्री १२ पासून ठाणे परिसरात वीज नव्हती. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असती तर मुख्य बोर्ड जळाला असता, पण तसे झाले नाही. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.आज दुपारी १२ पर्यंत अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. जिवाची पर्वा न करता फॅक्टरीतच जवान घुसले. आतील महत्त्वपूर्ण यंत्रसामग्री जवानांनी वाचविली. त्यांच्या या कामाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक केले. फॅक्टरीला लागलेली आग कशामुळे लागली हे सांगू सांगता येत नाही, पण शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशामक जवानांनी अथक परिश्रमातून जवळजवळ १ कोटी रुपयांचा माल वाचविण्यात यश मिळविले. यावेळी डिचोलीहूनसुद्धा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. फोंड्याहून सिनियर स्टेशनफायर ऑफिसर श्री डी.डी. रेडकर हेही घटनास्थळी दाखल झाले. वाळपई व डिचोली अग्निशामक दलाचे जवान एल. माजिक, विडी पिरंणकर, ए.आर.पोकळे, व्ही. एम. गाड, पी. श्रीकांत गावकर, पी.शंकरगावकर, व्ही.व्ही. परब, एस.बी.गावस या जवानांनी धाडसाने आग विझविण्यात यश मिळविले.वाळपई पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी सुरेश गावस तपास करीत आहेत.

No comments: