Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 March, 2008

राज्यपाल, सभापतींची 'कुकर्मे' सोमनाथ चटर्जींना पाठविणार

विरोधी पक्षनेते पर्रीकर यांची माहिती
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): राज्यपाल एस. सी. जमीर व सभापती प्रतापसिंग राणे यांनी गोव्यात अल्पमतात असलेले सरकार आपल्या पदाचा गैरवापर करून कशा प्रकारे सत्तेवर ठेवले आहे, याचा सर्व पुराव्यांसह तपशील लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली. आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घटना व कायद्याला फाटा देऊन या राज्यपाल व सभापती यांनी उघडपणे कॉंग्रेसची तळी उचलून धरताना पक्षपाताचा कळस गाठला आहे. घटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या या व्यक्तींनी गेल्या दोन्ही विधानसभा अधिवेशनावेळी घेतलेला पवित्रा लोकशाहीची जाहीर थट्टा होय. त्याबाबतची सगळी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राष्ट्रपती सौ. प्रतिभा पाटील व सर्व राज्यांच्या सभापतींना आपण पाठवणार आहोत. राज्याचा कारभार चालवताना सर्व नियम व कायदेकानू कसे वेठीस धरले जातात याचा अहवाल सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही पाठवला जाईल, असे पर्रीकर म्हणाले.
राज्यपालांनी सभापतींना त्वरित आदेश द्यावेत
राज्यपाल जमीर यांनी सभापती प्रतापसिंग राणे यांच्या विरोधातातील अविश्वास ठराव येत्या अधिवेशनात चर्चेला घेण्याचे त्वरित आदेश द्यावेत,अशी मागणी पर्रीकर यांनी केली. सभापतींविरोधातील अविश्वास ठरावाचा प्रस्ताव चर्चेस घेण्यास अमान्य करण्याचा अधिकार सभापतींना नाही. भाजपने पहिल्यांदा दाखल केलेल्या नोटिशीवर तारीख घातली नाही म्हणून उंटावरून शेळी हाकणाऱ्या काही नेत्यांनी टीका केली. मात्र कायद्यानुसार ही नोटीस सचिवालय कार्यालयात नोंद झाली तीच तारीख अधिकृत ठरते. आता दुसरी नोटीस ७ मार्च रोजी देण्यात आली असून ती दाखल करून घेण्याचे आदेश राज्यपालांनी ताबडतोब सभापतींना द्यावेत अशी मागणी पर्रीकर यांनी केली.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys