Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 March, 2008

हिंदूंचे उत्थान ही काळाची गरज : ब्रहेशानंदाचार्य

म्हापसा, दि. १६ (वार्ताहर): हिंदू धर्माच्या उत्थानाची आज नितांत गरज आहे. मंदिरे शाबूत राहिली पाहिजेत कारण ती आपली श्रद्धास्थाने आहेत. प्रत्येकाला मंदिराविषयी तळमळ असावी, अशी अपेक्षा आज ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी करासवाडा येथे संत समाज आयोजित श्री. सद्गुरू भक्ती महोत्सवात दिव्य धर्म प्रबोधन कार्यक्रमात व्यक केली.
आज मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे. देशाचा सांभाळ करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. पद्मनाभ संप्रदाय हा जगाचा उद्गाता आहे, त्याचे कार्य ईश्वरी आहे. हे कार्य ईश्वर करून घेत असतो. हिंदू धर्म संवर्धनाचे कार्य हे देशकार्य आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा धर्म टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रा. अनील सामंत, जयेश थळी, प्रा. यल्लोजी मेणसे, महोत्सवाचे अध्यक्ष रोहिदास पित्रे उपस्थित होते.
सौ.व श्री. मनोज वाळके यांनी स्वामींची पाद्यपुजा केली. संप्रदायाचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. सामंत, मेणसे, जयेश थळी व संगम भोसले यांचा स्मृतीचिन्हे देऊन गौरवा करण्यात आला. सूत्रसंचालन संगम भोसले यांनी केले. संदीप कोरगावकर यांनी आभार मानले. शिष्यवर्गातर्फे स्वामींना यावेळी पू. ब्रह्मानंद स्वामींची प्रतिमा देण्यात आली.

No comments: