Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 19 March, 2008

पसरिचा यांनी प्रशासनाला फटकारले

मडगावच्या वाहतूक व्यवस्थेतील गोंधळ
मडगाव,दि. १९(प्रतिनिधी): गोव्यातील वाहतूक व्यवस्थेची बृहद योजना तयार करण्याचे काम सरकारने ज्यांच्याकडे सोपवले आहे ते मुंबईचे माजी पोलिस महासंचालक डॉ. पी. एस. पसरीचा यांनी आज (बुधवारी) मडगावातील प्रमुख वाहतूक चौक व रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक गोंधळास नगर नियोजन , सार्वजनिक बांधकाम ही खाती तसेच नगरपालिकासारख्या संस्थाची कायदा पालनातील बेपर्वाईच जबाबदार असल्याचे सांगून फटकारले.
मडगावातील पूर्व बगल रस्त्याची पाहाणी करताना तेथे रस्त्यालगत उभ्या राहिलेल्या नव्या
इमारती पाहून ते संतापले. महामार्गापासून ४० मीटर मर्यादेचा नियम कुठे गेला, असा सवाल त्यांनी सार्वजनिक बांधकाम व नगर नियोजन अधिकाऱ्यांना केला.
कदंब बसस्थानकालगत ज्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत त्याकडे अंगुलीनिर्देश करून तेथे पार्किंगची व्यवस्था कशी असेल, असा सवालही त्यांनी केला.
याच संदर्भांत त्यांनी बसस्थानकालगत सरकारी कार्यालये एकवटलेल्या एका बहुमजली इमारतीचा उल्लेख पाकिर्ंंगव्यवस्थेबाबत केला व म्हटले की पार्किंग व्यवस्थेचा अजिबात विचार न करता बहुमजली इमारतींना वारेमाप परवाने देणारे गोवा हे देशातील एकमात्र राज्य असावे.घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही करण्याबाबत नोकरशाही व शासनकर्ते उदासीन असल्याचेच हे प्रतीक असल्याची मल्लिनाथी त्यांनी केली.
पसरीचा यांनी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई , उपअधीक्षक उमेश गावकर, वाहतूक निरीक्षक धर्मेश आंगले तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते यांच्यासमवेत शहरातील मोक्यांच्या चौकांची व रस्त्यांची ऐन गर्दीच्या वेळी पाहणी केली. कोलवा जंक्शन ते नुवे व आर्लेम ते फातोर्डा या रस्त्यावर फेरफटका मारला.
आपला पाहणी अहवाल ते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सादर करणार आहेत.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys