Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 March, 2008

"आलदिया'चा स्लॅब कोसळून पाच कामगार गंभीर जखमी

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): मालभाट बांबोळी येथील वादग्रस्त ठरलेल्या आलदिया द गोवा प्रकल्पाच्या चौथ्या भागाचे काम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून ५ गंभीर जखमी तर ८ कामगार किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. इस्पितळात रोहित खान, अख्तर अन्सारी, तटवानी मोहमद, गोरखनाथ मुंदूल व राजू (सर्व२५ वर्षीय) अशी या कामगारांची नावे आहे. रात्री ८.३० पर्यंत कोसळलेला स्लॅब काढण्याचे काम सुरू होतो. परंतु दोन्ही "हिताची' नादुरुस्त झाल्याने रात्री ९ वाजता काम बंद करण्यात आले. सायंकाळी ५ च्या दरम्यान सुमारे एक माड उंचीवर तीनशे चौरस मीटर रुंदीचा स्लॅब घालण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. काम जवळजवळ पूर्ण होत आले असतानाच स्लॅबला खाली लावण्यात आलेले टेकू हलल्याने संपूर्ण स्लॅब खाली कोसळला.
कोसळलेल्या या स्लॅबवर १८ तर खाली ४ कामगार काम करीत होते, अशी माहिती मिळाली. कोसळलेल्या स्लॅबच्या खाली कोणीही अडकून पडलेला नसल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी दिली. टेकू हलल्यानेच स्लॅब कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून दोषांवर रीतसर तक्रार दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी श्री. नाईक यांनी सांगितले. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांच्या समवेत अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, मामलेदार महादेव आरोंदेकर, पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सलिम शेख घटनास्थळी हजर होते. तर अग्निशामक दलाचे व "आलदिया द गोवा' चे कामगार बचाव कामाला लागले होते. या संपूर्ण घटनेचा तांत्रिकदृष्ट्या अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सायंकाळी ५ वाजता घडलेल्या हा स्लॅब काढण्याचे काम एकदम धिम्या गतीने सुरू होते. अभियंता सुब्रमण्यम यांच्या देखरेख खाली स्लॅब घालण्याचे काम सुरू होते. ही घटना घडल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या फोरमन व कंत्राट दराला बोलवून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु शेवट पर्यंत ते घटनास्थळी आले नव्हते.
वादग्रस्त ठरलेल्या हे बांधकाम बंद पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोवा बचाव अभियानातर्फे जनआंदोलन सुरू करण्यात आले होते. हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी हजारो वृक्षांची कत्तल करून या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे किनारी नियंत्रण विभागाचे उल्लंघन केल्याने हे प्रकरण न्यायालयात पोचले होते. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी या प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय किनारी क्षेत्र व्यवस्थापन यांच्याकडून "आलदिया द गोवा'ने पोषक अहवाल न्यायालयात सादर केल्याने त्यावरील ऑक्टोबर २००७ साली बंद उठवण्यात आली होती.
या संपूर्ण घटनेचा पंचनामा आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सलिम शेख यांनी केला.

4 comments:

Anonymous said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Impressora e Multifuncional, I hope you enjoy. The address is http://impressora-multifuncional.blogspot.com. A hug.

Anonymous said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Webcam, I hope you enjoy. The address is http://webcam-brasil.blogspot.com. A hug.

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys