Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 19 March, 2008

बायंगिणीची जागा लवकरच ताब्यात

पणजी महापालिकेला कचरा टाकण्यासाठी बायंगिणीची जागा सरकारने निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली त्याबाबती फाईल सध्या ऍडव्होकेट जनरल यांच्याकडे आहे. तेथून ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पोहोचल्यानंतर ताबडतोब भूसंपादन कायद्याव्दारे ती जागा दोन दिवसांत ताब्यात घेतली जाणार आहे. गेली दोन वर्षे सरकार या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. उद्योजक अनिल खवंटे यांनी केवळ खास महापालिकेच्या इच्छेपोटी टोंक येथील जागा काही दिवसांसाठी कचरा टाकण्यास अनुमती दिली होती ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता त्यास परवानगी नाही. त्यामुळे सध्या कचऱ्याची समस्या हाताळताना महापालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. सरकारच्या सहकार्यानेच ही समस्या सोडवली जाऊ शकते, असे महापौरांनी स्पष्ट केले.

थकित घरपट्टी वसुलीसाठी कडक उपाययोजना: महापौर
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): लोकांनी थकवलेली घरपट्टी वसूल करण्यासाठी पणजी महापालिका कडक पावले उचलणार आहे. सुमारे ६ ते ७ कोटी रुपयांची ही वसुली एका वर्षाच्या आत जमा करवून घेतली जाईल, अशी माहिती महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी आज येथे दिली. यावेळी उपमहापौर यतीन पारेख तथा इतर नगरसेवक उपस्थित होते.
बाजारातील गाळ्यांच्या वाटपात झालेल्या गांेंधळाची चौकशी करण्याबरोबर हा गुंता प्राधान्याने सोडवला जाईल. पणजी शहरातील पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी खास भरारी पथक नेमण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून हे पथक शहरात फिरणार असून पदपथावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे सामान जप्त केले जाणार आहे. पणजीतील हॉटेल रेगोजवळ बसणारे मासेविक्रेते व मांडवी पुलाच्या कडेला बसणारे फळे तथा भाजी विक्रेत्यांवरही कारवाई केली जाणार आहे. विविध माहिती फलकांचे खास सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या फलकांसाठी भरावयाचा कर वसूल करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. येत्या १ एप्रिलपासून शहरातील विविध रस्त्यांवर "पे पार्किंग'सुरू केले जाणार असल्याचे टोनी यांनी सांगितले.
-गाळेवाटप गोंधळाची चौकशी होणार
-पदपथांवरील विक्रेत्यांवर कारवाई
-पणजीत १ पासून "पे पार्किंग'

No comments: