Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 August, 2010

सूर्यकांत जोग यांचे निधन

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - पत्र सूचना कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत जोग यांचे आज संध्याकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. उद्या १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा व्हडलेभाट ताळगाव येथील त्यांच्या निवासस्थानावरून सांतीइनेज स्मशानभूमीकडे निघेल.
दै. "गोमंतक'मध्ये उपसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या पत्रकारितेला आरंभ केला. त्यानंतर गेली २५ वर्षे पत्र सूचना कार्यालयात विविध पदांवरून त्यांची वरिष्ठ अधिकारीपदी नेमणूक झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते.आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

No comments: