Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 August, 2010

भारतीयांच्या संशोधनावर चिखलफेक

दुसऱ्या प्रकरणातील पहिलेच वाक्य सूचक आहे. जेम्स लेन लिहितो - In blood sarifice we find the genesis of the Shivaji legend. Shivaji's first great act of heroisn was the killing of Afjal Khan. It was this deed that inspired the first known ballad of marathi literature, and it is this stroy, more than any other that Maharastrians today know in detail. ः (पृ. २०)
वरील वाक्यरचनेमध्ये मोठी खोचक सूचना आहे. अफजलखान वधाला अज्ञानदास शाहीरच नव्हे तर जेम्स लेनसुध्दा नरबळी मानतो. तीनशे वर्षांपूर्वीच्या पोवाड्यात ती कल्पना स्वीकारार्ह वाटते; पण एकविसाव्या शतकातही तिचा निर्देश नरबळी या उद्देशाने करताना त्या मागची विकृत दृष्टी दिसते. अफजलखान वधाच्या घटनेमुळे महाराजांचे कर्तृत्व, दूरदर्शीपणा आणि योजनाबद्ध कार्यशैली जगासमोर आली. अफजलखानाची पूर्वीची कारकीर्द पाहता तो महाराजांना वैयक्तिक भेटीदरम्यान दगा केल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्टच होते. कारण त्याने इ. स. १९३९ साली शिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंग याला अभय देऊन आपल्या छावणीत भेटीसाठी बोलावले व ऐनवेळी विश्वासघात करून त्याला ठार मारले होते. तसेच विजापूरवरून निघण्यापूर्वी त्याने काही दिवस आपल्या जनानखान्यात यथेच्छ उपभोग घेऊन निघण्याच्या वेळेस दोनशे बेगमांची निर्दयपणे कत्तल केली होती. (श. शि. पृ. ३०८ - ३०९) महाराजांचे मोठे भाऊ संभाजी यांच्या मृत्यूस तोच कारणीभूत होता आणि शहाजी राजांना कैदी करण्यातही त्याचाच पुढाकार होता. असा अफजलखान महाराजांना सुखासुखी परत जाऊ देईल हे शक्यच नव्हते. या भेटीचा निकाल दोन्ही बाजूंनी लागणे शक्य होते. महाराजांच्या सावधपणामुळे अफजलखानाचा वार वाया गेला. मात्र कुठल्याही परिस्थितीत अफजलखानाच्या सैन्याची जिरवायची, त्याला निसटू द्यायचे नाही हे लक्ष्य ठेवूनच महाराजांनी मावळ्यांचे सैन्य जावळीच्या रानात लपून राहण्यासाठी तयार ठेवले होते. स्वाभाविकच त्या वेळेपासून अफजलखान वधाची रोमहर्षक कथा महाराष्ट्रात माहीत असणे स्वाभाविक आहे.
त्यानंतरचे जेम्सचे विधान चूक आहे. अज्ञानदास शाहिराचा अफजलखान वधाचा पोवाडा हा मराठीतील सर्वांत प्रथम पोवाडा आहे, असे तो म्हणतो. ते खरे नाही. महाराष्ट्रातील पोवाडा, गोंधळ, बीरमाळ हे गायनप्रकार फार जुने आहेत. इतिहासाचार्य राजवाड्यांनी "महिकावतीची बखर' या ग्रंथामध्ये केशवदेवाच्या वेळच्या (शके ११००। १२०० म्ह इ. स. ११७८ । १२७८) पोवाड्याचा निर्देश केला आहे. तेव्हा अज्ञानदास शाहिराचा पोवाडा हा मराठीतील पहिला पोवाडा होता हे जेम्स लेनचे प्रतिपादन चुकीचे आहे. (संदर्भ - शाहिरांचे छत्रपती शिवाजी महाराज प्रस्तावना - पृ. पंचवीस इ. स १९८८).

No comments: