Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 2 August, 2010

उ.प्र.तील रस्ता दुर्घटनेत सात ठार

गोरखपूर, दि. १ ः गोरखपूरजवळील कुशीनगर जिल्ह्यातील तितला खेड्याजवळ काल संध्याकाळी विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका जीपने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत कमीतकमी सात जण ठार, तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी आज येथे सांगितले.
गोरखपूरला जाणाऱ्या जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व विरुध्द बाजूने येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीपने जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीन जणांनी दवाखान्याच्या मार्गावर असतानाच प्राण सोडले. जखमींना येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

No comments: