Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 January, 2009

सम्राट गस्तीनौकेचे आज जलावतरण

वास्को, दि.२० (प्रतिनिधी): गोवा शिपयार्डने किनारारक्षक दलासाठी बांधलेल्या "आय.सी.जी.एस सम्राट' या गस्ती नौकेचे जलावतरण उद्या बुधवारी सकाळी ९.५३ वाजता संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या हस्ते होणार आहे.त्यासाठी आज उशिरा रात्री त्यांचे गोव्यात आगमन झाले.
"एमपीटी'च्या धक्का क्र. १० वर हे जलावतरण होणार असून नंतर ही नौका देशसेवेत रुजू होणार आहे. यावेळी गोवा शिपर्याडचे मुख्य संचालक ए. के. हंडा, गोवा किनारारक्षक दलाचे प्रमुख एम. एस. डांगी, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ही गस्ती नौका सर्वांत मोठी असून विविध अत्याधुनिक यंत्रणांनी ती सज्ज आहे.
दरम्यान यानंतर गोवा शिपयार्डच्या आधुनिकरण प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होणार असून श्री. अँटनी यांच्या हस्ते तो पार पडेल. गोवा शिपयार्यडच्या वसाहतीत सकाळी १०.५० च्या सुमारास होणाऱ्या सदर कार्यक्रमावेळी संरक्षण उत्पादन राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग हेही उपस्थित राहणार आहेत.

No comments: