बाणावलीतील बैठकीत प्रचंड गदारोळ
११ मे रोजी ग्रामसभा
अधिकाऱ्यांची भंबेरी
पंचायतीचा अजब कारभार
मडगाव, दि.२ (प्रतिनिधी): बाणावली नागरिक कृती समितीच्या मागणीवरून आज (शुक्रवारी) उच्चस्तरीय बैठकीत बाणावलीतील त्या तिन्ही वादग्रस्त महाकाय गृहनिर्माण प्रकल्पांना दिलेले परवाने मागे घेण्याचा व भविष्यात अशा प्रकल्पांना ग्रामसभेने मंजुरी दिल्याशिवाय ते विचारात न घेण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी येत्या ११ मे रोजी खास ग्रामसभा बोलावण्यात आली असून तीत या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाईल.
बाणावली येथे सरपंच मारिया फर्नांडिस यांनी बोलावलेल्या या बैठकीला पर्यटनमंत्री मिकी पाशेको,गटविकास अधिकारी उदय प्रभुदेसाई, सार्वजनिक बांधकाम, वीज व पाणीपुरवठा खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.
वासुवाडो, बाणावली व सोनिया या ठिकाणच्या महाकाय प्रकल्पांना दिलेले बांधकाम परवाने मागेघ्यावेत , नगरनियोजन खात्यातून या बांधकामाबाबतची सर्वकागदपत्रे मागून घ्यावीत व ती ११ रोजींच्या ग्रामसभेसमोर ठेवावी व ग्रामसभेचा निर्णय अंतिम ठरवला जावा, असे या बैठकीत निश्चित झाले. तोपर्यंत या तिन्ही प्रकल्पांचे काम बंद ठेेवावे असे सर्वानुमते ठरले.
या खास बैठकीसाठी बोलावलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचीही कुचंबणा झाली. विशेषतः पाणीपुरवठा व वीजखात्याचे अधिकारी एकाही प्रश्र्नाचे निरसन करू शकले नाहीत.
-----------------------------------------------------------------
बैठक की कुस्तीचा आखाडा!
ही बैठक मंत्री मिकी पाशेकों तसेच बाणावली पंचांसाठी अत्यंत अडचणीची ठरली. उपस्थितांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला ही मंडळी समाधानकारक उत्तर देऊ शकली नाहीत. त्यामुळे परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वारंवार घडले. या पार्श्वभूमीवर येत्या ११ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत काय घडू शकते, याची झलक पाहायला मिळाली.
-----------------------------------------------------------------
Saturday, 3 May 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment