Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 1 May, 2008

गोव्याचा वीर 'सामनावीर' स्वप्निलचा धडाका...

३४ चेंडू, १० चौकार, एक षटकार
जयपूर, दि. १ : गोव्याचा स्वप्निल अस्नोडकर व युसूफ खान यांच्या अर्धशतकी खेळ्या व उमर गुल याची भेदक गोलंदाजीच्या बळावर इंडियन क्रिकेट लीगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० स्पर्धेतील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाताच्या नाईट रायडर्स संघाचा ४५ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्स संघाच्या विजयात ६० धावांचे महत्वपूर्ण योगदान दिलेला स्वप्निल "सामनावीर'ठरला.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार शेन वॉर्नने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९.८० धावांच्या सरारीने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा झोडल्या आणि प्रतिस्पर्धी कोलकाता संघासमोर विजयासाठी १९९ धावांचे आव्हान उभे केले.
विजयासाठीचे हे १९९ धावांचे आव्हान पेलणे कोलकाता संघाला कठीण गेले. त्यांचा डाव १९.१ षटकांत १५१ धावांत संपला.
त्यात सलमान बटने ७, कर्णधार सौरभ गांगुलीने ५१, अजित आगरकरने २०, डेव्हिड हसीने ४२, दासने ११, शुक्ला व गुलने प्रत्येकी २, तर सहा, शर्मा, हॉज,डिंडा यांनी प्रत्येकी एका धावेचे योगदान दिले. सौरभच्या अर्धशतकी खेळीत ४ चौकार व १ षटकाराचा समावेश होता तर हसीच्या ४२ धावांत १ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित २० षटकांत १९८ धावा केल्या.
ग्रॅमी स्मिथ व स्वप्निल यांनी राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात केली. ग्रॅमी स्मिथ २ धावा काढून शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद होऊन माघारी फिरला. तिसऱ्या स्थानावर मोहम्मद कैफ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने अस्नोडकर याला सुरेख साथ देताना ३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. त्याला अजित आगरकरने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या युसूफ पठाणने ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. सलामीला आलेल्या अस्नोडकरने १० चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. आर. जडेजाने २ चौकार व १ षटकाच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले.
धावफलक ः राजस्थान रॉयल्स
जी. स्मिथ त्रि. गो. शर्मा २, स्वप्निल अस्नोडकर झे. हसी गो. उमर गुल ६०, मोहम्मद कैफ झे. व गो. आगरकर २१, युसूफ पठाण त्रि.उमर गुल ५५, वॅटसन पायचीत गो. उमर गुल ०, आर.जडेजा त्रि. गो. शुक्ला ३३, शेन वॉर्न धावचीत (गुल/सहा) ७, एस.रणवीर नाबाद ३, एम,रावत नाबाद १, अवांतर १४. एकूण ः ७ बाद १९६
गडी बाद होण्याचा क्रम ः
१-११, २-५३, ३-१०६, ४-१११, ५-१६८, ६-१९०, ७-१९१. गोलंदाजी ः
डिंडा ४-०-३०-०, ईशांत शर्मा ४-०२६-१, अजित आगरकर ४-०-४६-१, उमर गुल ४-०-३१-३, हसी २-०-२६-०, गांगुली १-०-१४-० शुक्ला १-०-१६-१
राजस्थान नाईट रायडर्स
सलमान बट त्रि. गो. तन्वीर ७, सौरभ गांगुली झे. कैफ गो.वॉर्न ५१, अजित आगरकर झे. रावत गो. वॅटसन २०, बी. हॉज धावचीत (त्रिवेदी) १, हसी त्रि. गो. त्रिवेदी ४२, शुक्ला धावचीत (रावत) २, दास झे.वॅटसन गो. तन्वीर ११, पी.सहा त्रि.गो. त्रिवेदी १, उमर गुल धावचीत (जडेजा / रावत) २, इशांत शर्मा धावचीत १, डिंडा झे.कोहली गो. वॅटसन १, अवांतर १२. एकूण ः १५१
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१५, २-४४, ३-५१, ४-११९, ५-१२०, ६-१४३, ७-१४५, ८-१४७, ९-१४७, १०- १५१. गोलंदाजी ः वॅटसन ३.१-०-२२-२, एस.तन्वीर ४-०-३०-२, एस.त्रिवेदी ४-०-३१-२, मुनाफ पटेल ४-०-२९-०, शेन वॉर्न २-०-२०-१, युसूफ पठाण २-०-१५-०.

No comments: