Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 1 May, 2008

काळ्या काचांविरुद्ध धडक कारवाई...!

मोहीम यापुढेही सुरू राहणार
वाहनधारक धास्तावले
पाऊण लाख दंड जमा
स्वहस्ते फिल्मिंग फाडले

पणजी, दि. १ (प्रतिनिधी): राज्यात काळ्या काचांच्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी छेडलेल्या मोहिमेत पहिल्याच दिवशी आज सुमारे ७०० वाहनांच्या काचांचे फिल्मिंग फाडून वाहनधारकांना दणका दिला. त्यामुळे दंडाद्वारे सुमारे पाऊण लाखाची भर सरकारी तिजोरीत पडली.
गेल्या आठवड्यात सरकारच्या कृती दलाच्या बैठकीत १ मेपासून काळ्या काचांविरोधात जोरदार मोहीम छेडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी. बी. प्रभू म्हापणे यांनी सांगितले.
काळ्या काचांच्या वाहने अनैतिक व्यवहार व गुन्हेगारी कारणांसाठी वापरण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात आल्याने कृती दलाने याची दखल घेऊन काळ्या काचांच्या विरोधात मोहीम छेडली आहे. गेल्या काही महिन्यांत गोव्यात घडलेल्या खून प्रकरणात मृतदेह काळ्या काच्यांच्या वाहनात घालून अज्ञात स्थळी टाकण्याचा प्रकार घडला आहे. तसेच अपहरण करण्यासाठीही अशा वाहनाचा वापर केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्यात काळ्या काच्यांच्या विरोधात निकाल देऊन त्यावर बंदी घातली आहे.
----------------------------------------------------------------------
पणजीत ११०, म्हापसा ४८, फोंडा १३१, वास्को १४५ आणि कुडचडेत ६० वाहनांच्या काचांवरील फिल्मिंग फाडून त्यांना दंड ठोठावण्यात आला. ३१९ वाहनचालकांनी पोलिसांसमक्ष आपल्या वाहनांचे फिल्मिंग फाडून टाकले. या वाहन चालकांना दंड न देता सोडून देण्यात आले. यावेळी अनेक वाहनधारकांनी पोलिसांशी वाद घातला.
-----------------------------------------------------------------------

No comments: